Heavy Rain Alert | कोल्हापूर, पुणे, साताऱ्यासह ११ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’

Heavy Rain Alert |
Heavy Rain Alert | कोल्हापूर, पुणे, साताऱ्यासह ११ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’
Published on: 
Updated on: 

पुणे : राज्यातील ११ जिल्ह्यांना दोन दिवस (सोमवार आणि मंगळवार) मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. यात प्रामुख्याने कोल्हापूर, पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड, लातूर, धाराशिव, गडचिरोली, नागपूर या ११ जिल्ह्यांचा समावेश आहे.

उत्तर भारतात तयार झालेला पश्चिमी चक्रवात आणि अरबी समुद्रात तयार झालेली वाऱ्यांची चक्रीय स्थिती या दोन प्रणालींमुळे देशातील काही भागात पाऊस तर काही ठिकाणी उष्ण हवामान असे मिश्र वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यातील ११ जिल्ह्यांना सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच २५ ते २८ दरम्यान अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झाले तर महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

असे आहेत अलर्ट (१९ व २० ऑक्टोबर)

कोल्हापूर शहर, कोल्हापूर घाट (१९, २०), पुणे शहर, पुणे घाट (१९, २०), सातारा शहर, सातारा घाट (१९, २०), रायगड, (१९), रत्नागिरी (१९), बीड (१९), लातूर (१९), धाराशिव (१९), गडचिरोली (१९, २०), नागपूर (१९, २०).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news