Rain Update: कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली या चार जिल्ह्यांना 14 व 15 नोव्हेंबर रोजी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट, तर उर्वरित राज्यात मात्र हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यातील हवामानात दररोज नवे बदल होत आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील आठ जिल्ह्यांना पावसाचा इशारा रविवारी देण्यात आला होता. मंगळवारी या अलर्टमध्ये पुन्हा बदल झाले असून, आता फक्त चार जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. यात आता कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली या चारच जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे. उर्वरित राज्यात मात्र अत्यंत हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
सोमवारचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : मुंबई 24.5, रत्नागिरी 22.1, डहाणू 19.4, पुणे 15.9, लोहगाव 17.3, अहिल्यानगर 15.7, जळगाव 15.4, महाबळेश्वर 14.6, मालेगाव, नाशिक 14.1, सांगली 19.1, सातारा 18, सोलापूर 20.8, धाराशिव 17.8, छत्रपती संभाजीनगर 17.4, परभणी 17.8, अकोला 20.2, अमरावती 18.9, बुलडाणा 18, ब्रह्मपुरी 18.7, इंद्रपूर 17, गोंदिया 16.8, नागपूर 17.6, यवतमाळ 17.5.