Pune crime : वकिलाला लुटणाऱ्या दोघांना यवत पोलिसांकडून अटक, दोघे फरार

वाखारी गावाजवळील घटना
Pune crime news
वकिलाला लुटणाऱ्या दोघांना यवत पोलिसांकडून अटक
Published on
Updated on

यवत/खुटबाव : वाखारी गावाजवळ महामार्गावर वकिलाची कार अडवून अश्लिल शिवीगाळ करत धमकावत त्यांना लुटणाऱ्या दोघांना यवत पोलिसांनी सोमवारी (दि.८) अटक केली. तुषार दत्तात्रय शेळके (वय २४, रा. शेळकेवस्ती वाखारी ता. दौंड जि. पुणे) आणि रोहित गोविंद कड (वय ३३ वर्षे, रा. स्टेशन रोड, यवत ता. दौंड जि. पुणे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या घटनेतील आणखी दोघेजण फरार आहेत.

Pune crime news
Mumbai crime : मुंबई पोलिसांना दहशतवादी हल्ल्याची खोटी माहिती देणा-या ज्योतिषास अटक

याबाबत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, वकील मधुसूदन सदाफुले हे आपल्या कुटूंबासोबत जात असताना वाखारीजवळ कारमधून चौघेजण आले. व त्यांनी सदाफुले यांची कार ((एमएच १३ बीएन ९५५९) अडवून त्यांना पत्नी व मुलीसमोर अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर धमकावत त्यांच्याकडील २५ हजाराची रक्कम जबरदस्तीने काढून घेत तेथून पोबारा केला. त्यानंतर मधुसूदन सदाफुले यांनी यवत पोलीस ठाण्यात धाव घेत चौघां चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी तपास सुरू करत गुन्ह्यात वापरलेल्या गाड्यांच्या नंबरवरून दोघांना गुन्ह्यात वापरलेल्या दोन कारसह अटक केली असून आणखी दोघांचा तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, विजय कोल्हे, सागर माने, अक्षय मोरे, गोविंद भोसले, पोलीस हवालदार प्रमोद शिंदे, गुरूनाथ गायकवाड, अक्षय यादव, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, संदीप देवकर, दत्ता काळे, विकास कापरे, गणेश कुतवळ, बाळासाहेब चोरमले, गणेश सोनवणे, प्रमोद गायकवाड, सचिन साळुंखे, वैभव भापकर, मारूती बाराते, विनोद काळे, अमोल भुजबळ, विशाल गवारी, सचिन काळे, शुभम मुळे, मोहन भानवसे यांच्या पथकाने केली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने करीत आहेत.

Pune crime news
Mumbai crime : मुंबई पोलिसांना दहशतवादी हल्ल्याची खोटी माहिती देणा-या ज्योतिषास अटक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news