पै. यश वासवंड ठरला ’पुरंदर केसरी’चा मानकरी

पै. प्रसाद जगदाळे उपविजेता
Purandar Kesari
पै. यश वासवंड ठरला ’पुरंदर केसरी’चा मानकरीPudhari
Published on
Updated on

सासवड: पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि सासवड येथील पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था व पुरंदर तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दिवंगत चंदूकाका जगताप यांच्या स्मरणार्थ सासवड येथे पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत आंबेगाव (ता. हवेली) येथील पै. यश वासवंड याने पिसर्वेचा (ता. पुरंदर) पै. प्रसाद जगदाळे याला चितपट करून 2025 चा ‘पुरंदर केसरी’ किताब पटकाविला.

माजी आमदार संजय जगताप, तात्यासाहेब भिंताडे, काका पवार, प्रकाश पवार, संजय हरपळे, माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे आदींच्या हस्ते पै. यश वासवंड याला 35 हजार रुपये रोख, प्रशस्तिपत्र, चांदीची गदा आणि मानाचा पुरंदर केसरीचा किताब, तर उपविजेता पै. प्रसाद जगदाळे याला 27 हजार रुपये रोख, प्रशस्तिपत्र व ट्रॉफी देण्यात आली.

सिल्व्हर ज्युबिली मोटर्सच्या वतीने ही दोन्ही बक्षिसे देण्यात आली. प्रसिद्ध कुस्ती निवेदक पै. हंगेश्वर धायगुडे यांच्या समालोचनाने आणि कोल्हापूरचे बापू आवाळे यांच्या हालगीवादनाने आखाड्यात रंग भरला.

पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पै. राजेंद्र जगताप, सदस्य पै. अशोक झेंडे, तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. पांडुरंग कामथे, सचिव पै. रवींद्रपंत जगताप, सदस्य पै. बाळासाहेब कोलते, पै. विनोद जगताप, पै. अभिजित मोडक, पै. तानाजी काकडे, पै. चंद्रकांत गिरमे, पै. रमेश जगताप, पै. भाऊ मोरे, पै. गुलाब गायकवाड, पै. संतोष सोनवणे, पुरंदर नागरीचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे आदी उपस्थित होते. पंच म्हणून तुषार गोळे, बाबू वरे, अमित म्हस्के, रोहिदास आमले व सहकार्‍यांनी काम पाहिले. रवींद्रपंत जगताप, जालिंदर काळे, महेश राऊत यांनी सूत्रसंचालन केले.

वजन गटनिहाय विजेते, उपविजेते मल्ल

30 किलो - आर्यन सोळंकी, प्रशांत ढाकणे (दोन्ही सासवड). 35 किलो - वेदांत भांडवलकर (आंबोडी), अर्णव हिवरकर (सासवड). 40 किलो - आर्यन मोडक (वडकी), सोहम काळे (सोनोरी). 45 किलो - सोहम हिवरकर, तीर्थराज जाधव (दोन्ही सासवड). 50 किलो - अथर्व भिसे (पानवडी), सोहम झेंडे (झेंडेवाडी ). 55 किलो - अक्षय धायगुडे (जेऊर), ओम गायकवाड (वडकी). 60 किलो - राहुल कुंभारकर (सासवड), समर्थ शेंडगे (होळकरवाडी). 66 किलो - आदित्य कुंभारकर (सासवड), प्रथमेश ढोणे (गराडे). 74 किलो - गणेश जगताप (सासवड), यशराज गाढवे (आंबेगाव खुर्द). खुला गट -अमित गायकवाड, प्रसाद जगदाळे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news