World Family Day: मोबाईलच्या पडद्यामागे हरवतोय कुटुंबातील संवाद

मानसोपचारतज्ज्ञांकडून ‌‘डिजिटल शिस्ती‌’चा सल्ला
World Family Day
World Family DayPudhari
Published on
Updated on

पुणे: एकेकाळी घरातील जेवणाच्या वेळी रंगणाऱ्या गप्पा, अंगणात ऐकू येणारे हास्य, आजी-आजोबांच्या गोष्टी आणि सण-समारंभात अनुभवला जाणारा आपलेपणा... हे सारे चित्र आता हळूहळू मोबाईल, इंटरनेटच्या पडद्याआड हरवत चालल्याचे दिसत आहे.

ऑनलाईन जगात गुंतलेल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रत्यक्ष संवाद कमी होत असून, त्यामुळे भावनिक दुरावाही वाढत आहे. शुक्रवारी (दि. 15) असलेल्या जागतिक कुटुंब दिनानिमित्त मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केलेली ही चिंता आजच्या बदलत्या सामाजिक वास्तवावर बोट ठेवणारी आहे.

World Family Day
Jejuri Flyover Project: जेजुरीला 250 कोटींचा उड्डाणपूल, तर फलटणच्या विकासासाठी 97 कोटी; गडकरींकडून पालखी मार्गावर घोषणांचा पाऊस

महाराष्ट्रात स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढला आहे. विशेषतः शहरी भागांमध्ये सोशल मीडिया, ऑनलाईन गेमिंग, ओटीटी व्यासपीठामुळे संवादाचे प्रमाण घटले आहे. किशोरवयीन मुले आणि 18 ते 50 वयोगटातील व्यक्ती ऑनलाइन माध्यमांच्या सर्वाधिक आहारी गेल्याचे चित्र दिसून येत आहे.

कुटुंबातील संवाद वाढविण्यासाठी हे करा

  • रोज किमान एक तास कुटुंबासोबत वेळ घालवावा.

  • जेवणाच्या वेळी मोबाईलचा वापर टाळावा.

  • पालकांनी मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यावर भर द्यावा.

  • कुटुंबासोबत फिरणे, खेळ खेळणे किंवा वाचनाचे उपक्रम राबवावेत.

  • मुलांच्या सोशल मीडियावरील वापरावर नियंत्रण ठेवावे.

World Family Day
Mula Mutha River Rejuvenation: मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा होणार विस्तार; मांजरी बुद्रुकपर्यंत कामाला मंजुरी

मी नोकरी करते. त्यामुळे हवा तसा वेळ माझ्या मुलींना देता येत नव्हता. त्यामुळे त्यांच्या हाती मोबाईल आला. पण, मुलींचा स्क्रीन टाइम वाढत असल्याचे आणि त्या आमच्याशी फारसे काही शेअर करत नसल्याचे लक्षात आले.

त्यानंतर मी आणि माझ्या पतीने त्यांचा स्क्रीन टाइम कमी करण्याचा निर्णय घेतला. जेवणाच्या वेळी प्रत्यक्ष संवाद, फिरायला जाणे, अभ्यासाविषयी विचारपूस, एकत्र खेळ खेळणे आणि गप्पा मारणे या गोष्टींना प्राधान्य दिले. त्यानंतर आमच्या कुटुंबातील संवाद वाढल्याचा सकारात्मक बदल जाणवला.

- नेहा आकीवाटे, पालक

घरात संवाद कमी झाल्यावर चिडचीड, मानसिक तणाव, एकटेपणा आणि गैरसमज वाढतात. विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये सोशल मीडियामुळे तुलना आणि मानसिक दबाव वाढत आहे. त्यामुळे ‌‘नो मोबाईल आणि फॅमिली टाइम‌’ ही संकल्पना आता प्रत्येक घरात रुजवावी लागेल.

- प्रा. चेतन दिवाण, मानसोपचारतज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news