स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाचे काम डिसेंबरनंतरच

जिऑलॉजिकल सर्व्हेचे काम पूर्ण; निविदा प्रक्रियेला सुरुवात
swargate metro
स्वारगेट मेट्रो Pudhari
Published on
Updated on

स्वारगेट-कात्रज भूमिगत मेट्रो मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला तीन महिन्यांनंतर सुरुवात होणार आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू असून, तिचे काम पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे मेट्रो अधिकार्‍यांनी सांगितले.

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मार्गाचे उद्घाटन आणि त्याच वेळी स्वारगेट- कात्रज भूमिगत मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे. भूमिपूजन कार्यक्रमानंतर या मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी मेट्रोकडून युद्धपातळीवर तयारी केली जात आहे. 100 फूट जमिनीखालून खोदकाम करावे लागणार आहे. त्याकरिता आवश्यक असलेला जिऑलॉजिकल सर्व्हेही मेट्रोकडून करण्यात आला आहे. आता निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तीन महिन्यांनंतर म्हणजेच डिसेंबरनंतर या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

कसा असेल मार्ग?

  • स्वारगेट-कात्रज हा मार्ग भूमिगत असणार

  • 5.46 कि.मी.ची विस्तारित मार्गिका असेल

  • तीन भूमिगत स्थानकांचा समावेश असेल

  • स्थानके मार्केट यार्ड, बिबवेवाडी, बालाजीनगर आणि कात्रज उपनगरे या प्रमुख क्षेत्रांना जोडतील

  • 2954.53 कोटींपर्यंत खर्च येणार

  • फेब—ुवारी 2029 पर्यंत कामे पूर्ण करण्याचे ध्येय

  • आगामी काळात मेट्रोने थेट कात्रज ते

  • निगडीपर्यंत प्रवास शक्य

  • निविदा प्रक्रिया लवकरच

  • तीन महिन्यांनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात

  • निधी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार, द्विपक्षीय एजन्सी इत्यादींच्या योगदानासह समान पद्धतीने सामायिक केला जाईल.

स्वारगेट-कात्रज भूमिगत मेट्रो मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला तीन महिन्यांनंतर सुरुवात होणार आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू असून, तिचे काम पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. दरम्यान, याकरिता या मार्गावर जिऑलॉजिकल सर्व्हे करणे आवश्यक आहे. त्यानुसार आम्ही हा सर्व्हे पूर्ण केला आहे.

हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक, महामेट्रो

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news