बस आगारात महिला सुरक्षा समित्या असाव्यात : डाॅ. निलम गोऱ्हे

Pune rape case | घटनेच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी साधला संवाद
Pune rape case
पूणे येथे डॉ. निलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला Pudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍कः पुण्यातील स्‍वारगेट बसस्‍थानकात मंगळवारी रात्री घडलेली घटना अंत्‍यंत घृणास्‍पद असून, या प्रकणातील पीडित महिलेच मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्‍याच बरोबर प्रत्‍येक बस स्‍थानकात महिला सुरक्षा समिती असणे गरजेच आहे असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्‍त केले. गोऱ्हे यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधला साधला.

पुढे त्‍यांनी सांगितले की यासंदर्भात आगार प्रमुख आणि पोलिसाशी मी बोलले आहे. त्‍याचबरोबर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी बोलणे झाल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे. आरोपी पर्यंत पोलीस लवकर पोहचतील गन्ह्यासंदर्भात धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत अशी माहिती त्‍यांनी दिली.

पुढे त्‍यांनी आगारप्रमूखांना काही सूचना दिल्‍या असल्‍याचे सांगितले. बसेस बंद झाल्यावर लॉक कशी करता येईल या दृष्टीने सूचना दिली तसेच बसस्‍थानकात महिला सुरक्षा कर्मचारी आणि पुरुष तैनात असणं गरजेचं आहे. बस बंद झाल्‍यानंतर बस लॉक करण्याची प्रक्रिया, बसमध्ये सीसीटीव्ही आणि पॅनिक बटण असावा यासाठी प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा झाली असून त्‍यांनी शब्द दिला आहे. बलात्‍काराची घटना अंत्‍यत निंदनीय असून या घटनेचे राजकीय भांडवल करू नये असे आवाहनही डाॅ. निलम गोऱ्हे यांनी यावेळी विरोधकांना केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news