‘दै. पुढारी’ आयोजित आणि पुना डिस्ट्रिक्ट अँड मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशनच्या सहकार्याने महिलांसाठी राईज अप बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सलग तिसर्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून खेळाडूंसह पालकांनी ही या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला आहे.
या स्पर्धा पुना डिस्ट्रिक्ट अँड मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशनच्या शिवाजीनगर येथील पीडीएमबीएच्या बॅडमिंटन कोर्टवर आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धा दि. 27 ते 30 नोव्हेंबर दरम्यान होणार असून दि. 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 पर्यंत मोफत नाव नोंदणी करता येणार आहेत. या स्पर्धेचा ड्रॉ दि. 25 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे. स्पर्धेत अकरा, तेरा, पंधरा, सतरा, एकोणीस वयोगटामध्ये एकेरी आणि दुहेरी गटाच्या होणार आहेत. महिलांमध्ये होणार्या गटामध्ये खुला गट, 30 वर्षावरील, 35 वर्षावरील, 40 वर्षावरील आणि 45 वर्षावरील अशा एकेरी आणि दुहेरी गटात या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत तब्बल दहा वेगवेगळ्या वयोगट प्रकारातील मुली आणि महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असणार आहे. स्पर्धेतील सर्व वयोगटातील विजेत्यांना तब्बल अडीच लाख रुपयांची रोख पारितोषिके, पदके, ट्रॉफी तर सहभागी सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या साईटवर क्लिक करून करा स्पर्धेसाठीचे रजिस्ट्रेशन