Crime News | हॉस्पिटलमध्ये महिलेवर बलात्कार

आरोपी सुपरवाझरला चतुः श्रृंगी पोलिसांकडून बेड्या
 हॉस्पिटलमध्ये महिलेवर बलात्कार
हॉस्पिटलमध्ये महिलेवर बलात्कारFile Photo
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

बाणेर येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये महिलेवर सुपरवाझरने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिला हॉस्पिटलमध्ये हाऊसकिपींगचे काम करते. याबाबत महिलेने सुरुवातीला हॉस्पिटलच्या सिक्युरीटी मॅनेजरकडे तक्रार केली होती.

मात्र त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. यानंतर पुढे या महिलेने चतुः श्रृंगी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी, चतुःश्रृंगी पोलिसांनी सोमनाथ लक्ष्मण बेनगुडे (वय ४२, रा. तळेगाव दाभाडे पिंपरी-चिंचवड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

बेनगुडे हादेखील हाऊसकिपींग सुपरवाझर म्हणून हॉस्पिटलमध्ये काम करतो. याबाबत २९ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार जून २०२४ रोजी हॉस्पिटलमधील रेडीएशन डिपार्टमेंटच्या चेंजिंग रूममध्ये घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर परिसरात हे हॉस्पिटल आहे. तेथे फिर्यादी महिला एका खासगी एजन्सीजच्या माध्यमातून हाऊसकिपींगचे काम करते. तर आरोपी बेनगुडे हादेखील सुपरवाझरचे काम करतो. फिर्यादी महिला ही तिच्या पतीपासून विभक्त राहते.

मागील चार वर्षांपासून त्या हॉस्पिटलमध्ये काम करते. २९ जून रोजी त्या नेहमीप्रमाणे कामावर आली होती. कामाची वेळ संपल्यानंतर ती हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर खाली आली होती. या दिवशी तिला दुपारची शिफ्ट करण्यास सांगण्यात आले होते. तिला आरोपी बेनगुडे खाली भेटला. त्याने फिर्यादीला सांगितले की, रेडीएशन विभागात धूळ तशीच आहे ती जाऊन साफ कर. त्यानुसार फिर्यादी रेडीएशन ओन्कोलॉजी विभागात काम करण्यासाठी गेली.

सायंकाळी सहाच्या सुमारास फिर्यादी बेनगुडे तेथे आला. त्याने विभागाचा दरवाजा बंद केला. यानंतर फिर्यादीला जबरदस्तीने चेंजिंग रूममध्ये ढकलले. फिर्यादीनी त्याला विरोध केला. मात्र बेनगुडे याने तिच्यावर बलात्कार केला. झालेल्या प्रकारामुळे फिर्यादी घाबरून रडू लागली. त्या वेळी बेनगुडे याने याबाबत कोणाला काही सांगितले, तर तुला कामावर राहू देणार नाही, अशी धमकी दिली.

फिर्यादी घाबरून घरी निघून गेली. दरम्यान, फिर्यादीवर कौटुंबिक जबाबदारी असल्यामुळे तिने याबाबत कोठे वाच्यता केली नव्हती. काही दिवसांनंतर तिने हॉस्पिटलच्या सिक्युरिटी मॅनेजरकडे तक्रार केली. त्यांनी फिर्यादीकडून तक्रार अर्जदेखील घेतला. मात्र पुढे काही झाले नाही, असे फिर्यादीने म्हटले आहे. त्यानंतर तिने चतुः श्रृंगी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी सुपरवाझर बेनगुडे याला अटक केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news