रोहकल येथे विजेची तार पडून महिला ठार

महावितरणच्या गलथान कारभारामुळे या महिलेचा बळी गेल्याची संतप्त भावना स्थानिकांनी व्यक्त केली
chakan News
रोहकल येथे विजेची तार पडून महिला ठारPudhari
Published on
Updated on

चाकण: प्रवाहित विजेची तार अंगावर पडून 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रोहकल (ता. खेड) येथे घडली. दरम्यान, महावितरणच्या गलथान कारभारामुळे या महिलेचा बळी गेल्याची संतप्त भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

शालन धर्माजी ठोंबरे (वय 55, रा. रोहकल, ता. खेड) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विशाल रामदास ठोंबरे (वय 37, रा. रोहकल, ता. खेड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी या भागातील महावितरणचे वायरमन सुखानंद ढोणे व संबंधित अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल केला.

संबंधितांच्या निष्काळजीपणामुळे विद्युत खांबावरील अ‍ॅल्युमिनियम तार तुटून शालन ठोंबरे यांना विजेचा बसला. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे चाकण पोलिसांत देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित महावितरणच्या तुटलेल्या तारेबाबत अनेकदा तक्रारी करून देखील दखल घेतली गेली नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news