बिबट्याच्या हल्यात महिला जखमी ; ११ महिन्यांचे बाळ बचावले

दोन बिबट्यापैकी एकाने पालामध्ये प्रवेश करीत झोपलेल्या महिलेवर हल्ला चढवला
Woman injured in leopard attack
बिबट्याच्या हल्यात महिला जखमीpudhari
Published on
Updated on

वेळ पहाटे ४ वाजताची, शेतात मेंढपाळानी रहाण्यासाठी ठोकलेल्या पालात एक महिला, महिलेचा ११ महिन्यांचा नातू व मुलगा असे गाढ झोपेत असताना दोन बिबटे एका पाठोपाठ एक पालाजवळ आले, पाला शेजारीच बकऱ्याचा वाडा असताना दोन बिबट्यापैकी एकाने पालामध्ये प्रवेश करीत झोपलेल्या महिलेवर हल्ला चढवला. त्यात महिलेच्या हाताला मोठ्या स्वरूपात जखमा झाल्या असून शेजारी झोपलेल्या २२ वर्षीय मुलाने आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने लागलीच धूम ठोकली असून जखमी महिलेस नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकामी दाखल करण्यात आले आहे; मात्र महिलेच्या शेजारी झोपलेला ११ महिन्यांचा नातू या घटनेत बचावल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

ही घटना ओतूर (ता. जुन्नर) हद्दीतील हांडेबन, वाघदरा भागातील अंबादास सुंदर डुंबरे यांचे शेतात घडली. मीराबाई बिरू बरकडे (वय ४६ )असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. महिलेचा मुलगा अमोल बिरू बरकडे (वय २२) व ११ महिन्यांचे बाळ सुखरूप आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news