नवरात्री 2024 : मनोकामना पूर्ण करणारी पुण्यातल्या भवानी पेठेतील श्रीभवानीदेवी

श्रीभवानी देवी मंदिराची स्थापना पेशवाईच्या शेवटच्या काळात
 bhavani devi
श्रीभवानीदेवीPudhari
Published on
Updated on

भवानी पेठेची ओळख म्हणजे येथील श्रीभवानी देवीचे मंदिर... पुण्यात जशा एक - एक पेठा वाढत गेल्या तशी भवानी पेठही अस्तित्वात आली, या मंदिरामुळेच भवानी पेठ असे नाव पडले. हे मंदिर देश-विदेशातील भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे आणि हजारो भाविक मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण करणार्‍या श्रीभवानी देवीचे मंदिर पुण्याची ओळख आहे. श्रीभवानी देवी मंदिराची स्थापना पेशवाईच्या शेवटच्या काळात झाली, असे म्हटले जाते. हे मंदिर साडेतीनशे वर्षांपेक्षा जास्त जुने आहे.

पुण्यातील ‘भवानी पेठ’ ही लाकूड बाजार पेठ म्हणून अनेक वर्षांपासून ओळखली जाते. या बाजारपेठेत 1760 साली तुळजापूरच्या तुळजाभवानी माता मंदिरासारखेच ‘प्रतिभवानी माता मंदिर’ उभारण्यात आले. तुळजापूरमधील देवीच्या दर्शनाला सर्वांना जाणे शक्य होत नसल्याने या मंदिराची उभारणी करण्यात आली असल्याचे म्हटले जाते. मंदिराला पूर्ण दगडी बांधकाम करण्यात आले आहे. मंदिरातील काळ्या पाषाणातील देवीची मूर्ती सुमारे अडीच फूट उंच आहे.

मंदिरात नवरात्रोत्सवात वैविध्यपूर्ण कार्यक्रम होतात आणि हा काळ भाविकांच्या गर्दीचा काळ असतो. मोठ्या संख्येने भाविक मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतात. तर दसर्‍याच्या दिवशी छबिना म्हणजे पालखी निघते. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात धार्मिक कार्यक्रम आयोजित केले असून, भजन - कीर्तनासह रोज सकाळी सहा वाजता ललिता सहस्त्रनाम पठण आणि त्यानंतर श्रीसुक्त पठण होणार आहे. नवरात्रात मंदिर रात्री अकरा ते पहाटे पाच या काळात दर्शनासाठी बंद असेल. पण, दिवसभर भाविकांना दर्शन घेता येईल. नऊ दिवस रोज सकाळी साडेदहा आणि रात्री साडेआठ वाजता आरती केली जाते.

विनायक मेढेकर, विश्वस्त, श्रीभवानीदेवी मंदिर

मूर्तीने कमंडलू, गदा, शंख ही आयुधे धारण केली आहेत. भवानीच्या उजव्या बाजळ्ला कोंढणपूरच्या देवीची अर्थात तुकाईची मूर्ती आहे. ही मूर्तीही काळ्या पाषाणातील असून, महिषासूरमर्दिनीच्या रूपातील आहे. भवानीच्या उजव्या बाजूला ओवरीत श्रीविठ्ठल- रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. मंदिरातील गाभारा दगडाने बांधलेला असून, समोर सभामंडप आहे. मंदिरात रोज सकाळी सहा वाजता देवीची पूजा - अर्चा होते. मेढेकर कुटुंबीय मंदिराची देखभाल पाहत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news