Pune Crime: राजस्थानात पतीचा खून; महिलेसह प्रियकर पुण्यात गजाआड

एक कॉल अन् बंडगार्डन पोलिसांची कारवाई : अनैतिक संबंधांत अडसर ठरत असल्याने केले कृत्य
Pune Crime News
राजस्थानात पतीचा खून; महिलेसह प्रियकर पुण्यात गजाआडPudhari
Published on
Updated on

पुणे: अनैतिक संबंधांतून प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून पसार झालेल्या महिलेसह दोघांना पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. राजस्थानातील सोजत सिटी गावात 20 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती.

सुखीदेवी मेवाड (वय 30), अशोक राठोड (वय 25, दोघे रा. रा. सोजत सिटी, जि. पाली, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत, तर कमलेश जेठाराम मेवाड असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत कमलेश यांचे वडील जेठाराम मेवाड यांनी सोजत सिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

फिर्यादी जेठाराम यांचा मुलगा कमलेश हा बेपत्ता होता. 20 फेब्रुवारी रोजी त्याचा मृतदेह शेतामध्ये आढळून आला होता. दाखल गुन्ह्याच्या तपासात कमलेश याचा खून पत्नी सुखीदेवी आणि तिचा प्रियकर मित्र अशोक यांनी केल्याची माहिती सोजत सिटी पोलिसांना मिळाली. खून केल्यानंतर दोघे पसार झाले होते.

खून प्रकरणातील आरोपी महिला आणि तिचा मित्र हे पुणे स्टेशन परिसरात असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, कर्मचारी ज्ञानेश्वर बडे, ज्ञानेश्वर गायकवाड यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने पुणे स्टेशन परिसरातील जयप्रकाश उद्यानाजवळ सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी कमलेशचा खून केल्याची कबुली दिली.

परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड, उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, प्रदीप शितोळे, सारस साळवी, ज्ञानेश्वर बडे, ज्ञानेश्वर गायकवाड यांनी ही कारवाई केली.

...असा काढला काटा

आरोपी राठोड हा कमलेशकडे कामाला होता. कमलेश याचा पाण्याचे जार विक्रीचा व्यवसाय आहे. तेथेच पत्नी सुखीदेवी आणि राठोडचे सूत जुळले. दोघांनी आपल्या अनैतिक संबंधांत अडसर ठरणार्‍या कमलेशचा काटा काढण्याची योजना आखली. कमलेश याच्या डोक्यात वार करून त्याचा खून केला.

त्यानंतर दोघांनी त्याचा मृतदेह घरापासून पाच किलोमीटर अंतरावर निर्जनस्थळी पुरून टाकला. मात्र, आठ ते दहा दिवसानंतर शेळ्या चारणार्‍या एका व्यक्तीच्या निदर्शनास कमलेशचा मृतदेह आढळून आला. शेतात पाणी दिल्याने त्याचा मृतदेह वर आला होता. त्या वेळी त्याचा खून झाल्याचे समोर आले. खून केल्यानंतर राठोड आणि कमलेशची पत्नी सुखीदेवी दोघे फरार झाले होते.

...दोघे असे अडकले जाळ्यात

कमलेश याचा खून केल्यानंतर सुखीदेवी आणि राठोड हे दोघे पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी कमलेश याची कागदपत्रे मागितल्यानंतर दोघांनी काढता पाय घेतला. कमलेश याच्या खुनाची बातमी वार्‍यासारखी पसरताच दोघांनी पुण्याकडे पळ काढला. दोघांनी आपले मोबाईल बंद केले होते.

त्यामुळे त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. राठोड याने पैसे मागण्यासाठी राजस्थानमध्ये एकाला फोन केला. त्याचवेळी तो जाळ्यात अडकला. त्याच्या मागावर असलेल्या राजस्थान पोलिसांनी ही माहिती बंडगार्डन पोलिसांना दिली. पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर बडे आणि त्यांच्या साथीदारांनी बंडगार्डन परिसरातील लॉज तपासले. त्यावेळी दोघे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात आढळून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news