‘उजनी’च्या पाण्याला नेमका पाझर फुटतो तरी कुठे?

उजनी धरणाची (यशवंत सागर) पाणीपातळी 35.60 टक्क्यांवर
Ahilyanagar
उजनी धरणPudhari
Published on
Updated on

भिगवण : पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची (यशवंत सागर) पाणीपातळी 35.60 टक्क्यांवर आली असून, धरणातील पाणीसाठ्याची वाटचाल उणेकडे सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे. अवघ्या अडीच ते पावणेतीन महिन्यांत (80 दिवस) पाण्याची इतकी झपाट्याने घट झाल्याने पाण्याला नेमका पाझर फुटतो तरी कुठे? हेच धरणग्रस्तांना कळायला तयार नाही. अजून किमान 4 महिने पाणी कसे पुरणार? अशी चिंता लाभक्षेत्रातील जनतेबरोबर शेतकर्‍यांना पडली आहे. तर, उन्हाळ्यात तीव— पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यात उजनी धरण भरल्यानंतर 117 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होतो. धरणाचा 63.65 टक्के मृतसाठा आहे, तर 53.57 टक्के उपयुक्त साठा आहे. दरवर्षी फेब—ुवारीच्या आसपास पाणी सोडण्यास सुरुवात होते. यंदाही जानेवारीपर्यंत 100 टक्के पाणीसाठा होता. फेब—ुवारी, मार्चदरम्यान खाली पाणी सोडण्यात आले; शिवाय सिना-माढा, देगाव उपसा सिंचन योजना आणि मुख्य कालव्यातूनही पाणी सोडले. त्यामुळे आता धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटून थेट 35.60 टक्क्यांवर आला आहे, तर येत्या काही दिवसांत 14 टक्के पाणी संपणार आहे व उजनीची वाटचाल उणेत जाणार आहे. साहजिकच, लाभक्षेत्रातील बळीराजाची धाकधूक वाढलीय, तर सोलापूर जिल्ह्याला पिण्यास पाणी सोडले जाते, असे सांगण्यात येत असले तरी सोलापूरकरांची तहान आहे तरी केवढी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भीषण टंचाईची घंटा आत्ताच वाजू लागली

उन्हाळ्यात सर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा इंदापूर, दौंड, कर्जत या तालुक्यांतील लाभक्षेत्रात येणार्‍या गावांना व शेतील बसतो. उन्हाळा आता कुठे उग्र रूप धारण करू लागल्याने अस्तित्वात असलेल्या पाण्याचा वापर व होणार्‍या बाष्पीभवनामुळे भविष्यात पाण्याच्या भीषण टंचाईची घंटा आत्ताच वाजू लागली आहे.

धरणग्रस्तांची 40 वर्षांतील मोठी शोकांतिका

पाणलोट क्षेत्रात वाढीव जलवाहिनी टाकणे, वीज वायर लांबविणे, चार्‍या खोदणे, यात शेतकरी घामाघूम होतो. केवळ नियोजनाअभावी येथील धरणग्रस्त उन्हाळ्यात सुकून जात असला, तरी राजकीय लोकांना व अधिकार्‍यांना घाम फुटत नाही, हीच धरणग्रस्तांची 40 वर्षांतील मोठी शोकांतिका आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news