Pune Water Supply: दक्षिण पुणे परिसरात उद्या पाणीपुरवठा बंद

पद्मावती परिसरातील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी दक्षिण पुण्याचा पाणीपुरवठा उद्या (शनिवारी) बंद ठेवला जाणार आहे.
water supply
दक्षिण पुणे परिसरात उद्या पाणीपुरवठा बंदfile photo
Published on: 
Updated on: 

Pune News: पद्मावती परिसरातील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी दक्षिण पुण्याचा पाणीपुरवठा उद्या (शनिवारी) बंद ठेवला जाणार आहे. त्यानंतर रविवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पर्वती एचएलआर गोल टाकीवरून पद्मावती पंपिंग स्टेशनला येणार्‍या 1000 मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनीमध्ये पद्मावतीमधील अवंती सोसायटीजवळ गळती सुरू झाली आहे. येथील दुरुस्तीसाठी येथून पाणीपुरवठा होणार्‍या सेमिनरी टाकी, बिबवेवाडी टाकी, तळजाई टाकी, अप्पर इंदिरानगर पंपिंग स्टेशन येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग

सहकारनगर, पद्मावती, वनशिव वस्ती, तिरुपतीनगर, चव्हाणनगर, संभाजीनगर, तळजाई, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर भाग 1 व 2, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, सुपर इंदिरानगर, शेळकेवस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर, डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलीसबरी पार्क, गिरीधर भवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे नं. 42, 46 (कोंढवा खुर्द) इत्यादी परिसर, पद्मावती टँकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, धनकवडी परिसर (पार्ट), गुलाबनगर, राऊत बाग, पुण्याईनगर, काशिनाथ पाटीलनगर, के. के. मार्केट परिसर, मनमोहन पार्क, तोडकर टाऊनशीप, स्टेट बँकनगर, ओम अभिषेक, ओम अलंकार, वास्तुकल्प, गृहकल्प सोसायटी, दामोदरनगर, विद्यासागर सोसायटी, 276 ओटा परिसर, वैभव सोसायटी, कॅनरा बँक परिसर, सुयोग-आदित्य परिसर, योगायोग सोसायटी, रम्यनगरी, जेधेनगर, जनसेवा सोसायटी, नवमित्र सोसायटी, भगली हॉस्पिटल परिसर, कोठारी ब्लॉक, वसंतबाग, अनिकेत सोसायटी, बिबवेवाडी-कोंढवा रस्ता, आईमाता मंदिर परिसर, गंगाधाम, गगनविहार, गगनगॅलॅक्सी, विद्यासागर सोसायटी, सोपान महाराज सोसायटी, मार्केट यार्ड संपूर्ण परिसर इत्यादी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news