पुणे : शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्य केल्याबद्दल कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांना पुणे कॅन्टोन्मेंट पुस्तक पतपेढीतर्फे 'महात्मा फुले ज्ञानरत्न पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.
'कॅम्प एज्युकेशन सोसायटी' या शैक्षणिक संस्थेमध्ये सुमारे ५१ वर्षे ते कार्यरत आहेत. 'पूना मर्चंट चेंबर्स' या व्यापारी संस्थेमध्ये त्यांनी सतत ६० वर्षे अविरत कार्य केले आहे. त्यांच्या कालावधीमध्ये दोन्ही संस्थेची झपाट्याने प्रगती झालेली आहे. तसेच इतर सामाजिक उपक्रमांमध्ये संचेती यांचा मोलाचा वाटा असतो. पदमश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते 'महात्मा फुले ज्ञानरत्न पुरस्कार' देऊन संचेती यांचा सन्मान करण्यात आले आहे.
तसेच कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या विलु पुनावाला इंग्रजी माध्यम शाळेस 'आदर्श शाळा पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमास पदमश्री गिरीश प्रभुणे, माजी राज्यमंत्री श्री. बाळासाहेब शिवरकर, ॲडव्होकेट अर्जुन खुरपे, दिलीप बुधानी व इतर मान्यवर उपस्थित होते.