Yashwant land deal: ‘यशवंत’च्या 700 कोटींच्या जमिनीचा 231 कोटींत सौदा; विकास लवांडे यांचा आरोप

या व्यवहारात कारखान्याचे म्हणजेच सभासद शेतकर्‍यांचे 469 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे, याचा सभासदांनी विचार करावा, असे आवाहन लवांडे यांनी केले आहे.
Yashwant News
‘यशवंत’च्या 700 कोटींच्या जमिनीचा 231 कोटींत सौदा; विकास लवांडे यांचा आरोपPudhari
Published on
Updated on

लोणी काळभोर: यशवंत सहकारी साखर कारखाना, थेऊर (ता. हवेली) यांची शंभर एकर जमीन पुणे कृपी उत्पन्न बाजार समितीला रेडीरेकनर दरानुसार 231 कोटी 25 लाख रुपयांत देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

थेऊर येथे सध्या सरासरी 20 लाख रुपये गुंठा जमिनीला भाव आहे. कारखान्याच्या 100 एकर जमिनीला बाजारमूल्य दराने किमान 7 कोटी रुपये प्रतिएकर भाव मिळायला हवा; म्हणजे 700 कोटी रुपयांची जमीन 231 कोटी 25 लाखांना दिली जाणार आहे, असा आरोप यशवंत बचाव शेतकरी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष विकास लवांडे यांनी केला आहे. (Latest Pune News)

Yashwant News
Rajgad Sugar Factory| ‘राजगड’चे नूतनीकरण करणार: संग्राम थोपटे

या व्यवहारात कारखान्याचे म्हणजेच सभासद शेतकर्‍यांचे 469 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे, याचा सभासदांनी विचार करावा, असे आवाहन लवांडे यांनी केले आहे. प्रसिद्धिपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जास्तीत जास्त 100 ते 125 कोटी रुपये लागतात. त्यासाठी गरजेइतकी म्हणजे 15 ते 20 एकर जमीन विक्री केली तरी गरज भागणार आहे.

Yashwant News
Khadakwasla Dam: ‘खडकवासला’त क्षमतेच्या दुप्पट पाण्याची आवक

मग 100 एकर विकण्याची गरज काय? शिवाय राज्य बँकेने कारखान्याच्या केलेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीला सर्वस्वी राज्य बँक व राज्य सरकार जबाबदार ठरते आहे. त्याची स्वतंत्र कहाणी आहे. कारखान्याच्या 100 एकर जमिनीची 469 कोटी नुकसान करून विक्रीबाबत शासन निर्णयाचे स्वागत करणार्‍यांनी थोडीतरी लाज शरम ठेवून स्वागत करावे. मुंबई उच्च न्यायालयात सर्व प्रकरण आधीपासून न्यायप्रविष्ट आहेच. नवा शासननिर्णय लवकरच कोर्टाच्या निदर्शनास आणून देणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news