Velhe Murder Case: जेवणाच्या पार्टीतील वादातून गोळीबार; विशाल चव्हाण हत्या प्रकरणी चौघांना अटक

कोल्हेवाडी-किरकटवाडीतील खळबळजनक प्रकार; दोन मुख्य आरोपी फरार, शोध सुरू
Arrest
ArrestPudhari
Published on
Updated on

वेल्हे: मित्रांसोबत जेवणाची पार्टी सुरू असताना झालेल्या किरकोळ वादातून गावठी पिस्तुलातून गोळी झाडून विशाल संजय चव्हाण (वय 24, रा. कोल्हेवाडी, किरकटवाडी) याची हत्या करणाऱ्या चौघा आरोपींना हवेली पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार निरंजन धावडे व दाद्या कडू हे दोघे अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

Arrest
PMC Election 2026 Result Live Update: पुण्यात मोठी उलथापालथ, आबा बागुल यांचा पराभव

सतीश देशमुख, श्रीराज दिघे, ऋषिकेश चितारे व गणेश चतुर (सर्व रा. कोल्हेवाडी, किरकटवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी हे 20 ते 25 वयोगटातील आहेत.

Arrest
Senior Citizen Voting Issues: ज्येष्ठांचा मतदानासाठी उत्साह, मात्र सुविधांअभावी मोठी गैरसोय

किरकटवाडी येथील कोल्हेवाडी भागात गणेश चतुर याच्या घरी जेवणाची पार्टी सुरू असताना विशाल चव्हाण व त्याच्या मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून संगनमत करून निरंजन धावडे याने गावठी पिस्तुलातून विशाल चव्हाण यांच्या डोक्यात गोळी झाडली. या गोळीबारात विशालचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर खुनाचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी विशालचा मृतदेह पुणे-पानशेत रस्त्यावरील डोणजे (ता. हवेली) येथील निर्जन भागातील ओढ्यात टाकून दिला.

Arrest
Pune Ward Voting Turnout: वानवडी–रामटेकडी–कोंढवा प्रभागांत दुपारनंतर मतदानाचा जोर

दरम्यान, मृतदेह आढळून आल्यानंतर हवेली पोलिस ठाण्याचे पथक बुधवारी (दि. 14) दुपारी घटनास्थळी दाखल झाले. मृताची सुरुवातीला ओळख पटली नाही. मात्र मृताच्या हातावरील गोंदणामुळे त्याची ओळख पटली. त्यानंतर अवघ्या 2 तासांत हवेली पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक वैशाली पाटील यांच्या पथकाने खुनाचा प्रकार उघडकीस आणला. पुढील काही तासांतच चौघा आरोपींना अटक करण्यात आली.

Arrest
Youth Voting Participation: महापालिका निवडणुकीत तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग; नवमतदारांचा मोठा उत्साह

खुनाची घटना नांदेड सिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने अटक केलेल्या आरोपींसह गुन्हा गुरुवारी (दि. 15) नांदेड सिटी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. फरार दोघा आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास नांदेड सिटी पोलिस करत आहेत.

संतोष तोडकर, सहायक पोलिस फौजदार, हवेली पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news