Vasantdada Sugar Institute Inquiry: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश! मुख्यमंत्र्यांकडून शरद पवारांची कोंडी?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर आयुक्त संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Vasantdada Sugar Institute Inquiry
Vasantdada Sugar Institute InquiryPudhari photo
Published on
Updated on

Vasantdada Sugar Institute Inquiry :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या अनुदानाचा योग्य विनियोग होतोय का नाही याची चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी साखर आयुक्त संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपास करून याचा अहवाल शासनाला पाठवण्यास सांगण्यात आलं आहे. या चौकशीच्या आदेशामागं शरद पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत नाहीयेत ना अशी चर्चा सुरू झाली आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या चौकशीचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर त्यावर तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या निर्णयावर टीका करत सत्ताधाऱ्यांवर 'ढोंगीपणा'चा आरोप केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत

राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत करत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.त्यांनी "मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा मी स्वागत करतो," असे सांगत त्यांनी या संस्थेची चौकशी आवश्यक असल्याचे मत मांडले.

ते म्हणाले, "ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देखील वर्गणी या न्यासाला (ट्रस्ट) गेली आहे. वर्गणी देणाऱ्याला आपल्या वर्गणीचा काय झालं हे माहित होणे आवश्यक आहे." राजू शेट्टी यांच्या मते, "वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट बाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत."

"उसाची 265 (Co-265) व्हेरायटी शेतकऱ्यांमध्ये पसंत असूनही, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमुळे अनेक कारखाने हा ऊस घेत नाहीत," असा गंभीर आरोप त्यांनी केला. इन्स्टिट्यूटचे अनेक विश्वस्त हे साखर कारखान्यांचे प्रतिनिधी असल्याने त्यात हितसंबंधांचा संघर्ष (Conflict of Interest) असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले.

हा तर ढोंगीपणा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी VSI च्या चौकशीच्या आदेशाला राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. "या संस्थेने गेल्या काही वर्षांत खूप क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत, अनेकदा शेतकऱ्यांना दिलासा या संस्थेने दिला," असे सांगत त्यांनी VSI च्या कार्याची प्रशंसा केली.

ते म्हणाले, "गेल्या अनेक वर्षांपासून देश आणि राज्यात यांचीच (सत्ताधारी) सत्ता आहे. यांना याआधी कुणी चौकशी करण्यापासून अडवलं होतं? ED, CBI, CID सगळं यांचंच आहे." जगताप पुढे म्हणाले "केवळ निवडणुका आल्या की असं ढोंगीपणाचं नाटक हे लोक करतात,"

"देवेंद्र फडणवीस यांचा हा अहंकारपणा आणि उद्दामपणा जो आहे, त्याची नोंद महाराष्ट्र ठेवत आहे. VSI च्या चौकशीसाठी समिती नेमणं हे हास्यास्पद आहे," असे जगताप म्हणाले.

जगतापांनी चौकशीचा निर्णय म्हणजे शरद पवार यांच्यावर वैयक्तिक हल्ला असल्याचे म्हटले आहे. "याच शरद पवार साहेबांनी ED ला सुद्धा गुडघे टेकवायला लावले होते हे देवेंद्र फडणवीस विसरले आहेत. अशा चौकशीने फार काही होणार नाही. पण, वयाच्या ८५ व्या वर्षी तुम्ही शरद पवार साहेबांना जो काही त्रास देत आहात, तसेच या संस्थेला डाग लावण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत आहेत," असा पलटवार त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news