श्वसनाच्या आजारांवर लसीकरणाची मात्रा : तज्ज्ञ डॉॅक्टरांचे मत 

श्वसनाच्या आजारांवर लसीकरणाची मात्रा : तज्ज्ञ डॉॅक्टरांचे मत 

पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रदूषण, चुकीची जीवनशैली, धूम्रपानासारख्या चुकीच्या सवयी, यामुळे सर्वच वयोगटांमध्ये श्वसनाच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. श्वसनाच्या आजारांची परिणती न्यूमोनियामध्ये होण्याची शक्यता असते. त्यामुळेच प्रौढांमध्येही न्यूमोनियाची लस घेण्याची गरज वाढत असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले. तीव्र न्यूमोनियामुळे फुप्फुसासह मेंदूच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. हृदयरोग आणि कर्करोगानंतर भारतात सर्वाधिक मृत्यू न्यूमोनियामुळे होतात, याकडे फुप्फुसविकारतज्ज्ञ डॉ. महावीर मोदी आणि संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. देवाशिष देसाई यांनी लक्ष वेधले. श्वसनाचे आजार, न्यूमोनियाचे वाढते प्रमाण, लसीकरणाची गरज याबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

डॉ. मोदी म्हणाले, पुण्यामध्ये सीओपीडीमुळे अनेक रुग्ण त्रस्त आहेत. वाढते धूम्रपान, हवेची खराब गुणवत्ता आणि न्यूमोकोकल आजारामुळे श्वसनाचे आजार वाढत आहेत. पुण्यातील 12-15 टक्के तरुण रोजचा दिवस धूम्रपानाने सुरू करतात. तसेच, शहरात श्वसनाचे आजार 30-35 टक्के लोकांमध्ये आढळून येतात. श्वसनाचे आजार नियंत्रित करण्यासाठी जीवनशैलीतील बदल आणि प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक आहेत. डॉ. देसाई म्हणाले, लहान मुलांसाठी न्यूमोनियावरील लस दिली जाते. मात्र, प्रौढांमध्ये लसीकरण करून घेतल्यास पन्नाशीनंतर न्यूमोनियाचा धोका टाळता येऊ शकतो.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news