Unseasonal Rain Alert : सावधान! राज्यभरात शनिवारपासून 22 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज

rain alert
rain alert(Pudhari File Photo)
Published on
Updated on

पुणे : राज्यात शनिवार (दि. 18) पासून 22 एप्रिलपर्यंत पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे कमाल तापमानात किंचित घट होणार असून काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळू शकतो. शुक्रवारी अकोला, अमरावतीचे तापमान 44.2, तर पुणे 40 अंशांवर पोहोचले होते.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पाच दिवस पाऊस होता. त्यानंतर पुन्हा तापमान वाढले. दुसरा आठवडा चांगलाच उष्णतेचा राहिला. आता 18 ते 22 एप्रिल या चार दिवसांत पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

शुक्रवारचे तापमान

अकोला 44.2, अमरावती 44.2, पुणे 40, जळगाव 41.5, कोल्हापूर 38.1, महाबळेश्वर 33.1, मालेगाव 43.4, नाशिक 37.5, सांगली 39.5, सातारा 41.2, सोलापूर 43.4, धाराशिव 41.2, छत्रपती संभाजीनगर 41.4, परभणी 42, बीड 40.8,, बुलडाणा 41.5, ब्रह्मपुरी 43.2, चंद्रपूर 43.4, गोंदिया 41.9, नागपूर 43.2, वाशीम 43.6, वर्धा 44, यवतमाळ 43.2.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news