Universe expansion speed | विश्वाच्या विस्ताराचा वेग 73.5 कि.मी. प्रतिसेकंद; शास्त्रज्ञांचे संशोधन

पुण्यातील आयुका संस्थेतील शास्त्रज्ञांचा जागतिक संशोधनात सहभाग; खगोलशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा शोध
Universe expansion speed |
विश्वाच्या विस्ताराचा वेग कसा मोजला, हे या आकृतीद्वारे दाखविले आहे.File Photo
Published on
Updated on

पुणे : विश्व 73.5 किलोमीटर प्रतिसेकंद या वेगाने विस्तारत आहे, हे खगोलशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचे संशोधन आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या एका मोठ्या समूहाने शोधले आहे. या संशोधनात पुण्यातील आयुका (आंतरविद्यापीठीय खगोल भौतिकी संशोधन संस्था) संस्थेतील प्रा. डॉ. अनुपम भारद्वाज यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.

या जागतिक संशोधनातून विश्वाच्या विस्ताराचा दर म्हणजेच हबल स्थिरांक अत्यंत कमी त्रुटींसह मोजण्यात आला आहे. संशोधकांनी हा दर 73.5 किलोमीटर प्रतिसेकंद प्रतिमेगा पार्सेक इतका असल्याचे सांगितले आहे. ही मोजणी फक्त एका पद्धतीवर आधारित नसून अनेक स्वतंत्र खगोलीय पद्धती एकत्र करून करण्यात आली आहे. यामध्ये विशिष्ट प्रकारचे तारे, स्फोट होणारे तारे (सुपरनोव्हा) तसेच आकाशगंगांचे इतर गुणधर्म वापरले गेले. त्यामुळे एखाद्या एका पद्धतीतील चूक अंतिम उत्तरावर परिणाम करू शकत नाही, असे संशोधकांनी स्पष्ट केले.

काय होणार फायदा?

* या संशोधनामुळे विश्वाचे वय, आकार आणि भविष्यातील बदल यांचा अधिक अचूक अंदाज लावणे शक्य होणार आहे.

* विश्वाचा विस्तार वाढविणार्‍या गूढ डार्क एनर्जीबद्दलही अधिक माहिती मिळण्यास मदत होईल.

* या निष्कर्षामुळे खगोलशास्त्रातील हबल टेन्शन या कोड्याला आणखी बळ मिळाले आहे.

* विश्वाच्या सुरुवातीच्या अवस्थेवर आधारित मोजमाप आणि सध्याच्या विश्वातील थेट मोजमाप, यामध्ये फरक आढळत असून, हा फरक आता केवळ मोजणीतील साधी चूक नसावी, असे या नव्या संशोधनातून स्पष्ट होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news