

Swargate Rape case : आज पहाटे पुण्यातील स्वारगेट येथे युवतीवर अत्याचाराची घटना घडली. या घटनेने खळबळ उडाली असून सर्व स्तरातून याचा निषेध नोंदवण्यात येत आहे. या घटनेवर राजकीय नेते तसेच महत्त्वाचा पदावरील व्यक्तींनीही खेद व्यक्त केला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यावेळी मत व्यक्त करताना म्हणाल्या, पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर काल सकाळी एका तरुणीवर बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना, या अनुषंगाने मी स्वतः पोलीस आयुक्त तसेच तपास अधिकारी या सगळ्यांशी बोलले आहे. सीसीटीव्ही फुटेजही मी स्वतः पाहिले आहे. ही तरुणी आरोपी सोबत काही वेळ बोलत होती आणि त्याने तिची दिशाभूल करून, तिला खोटं सांगून बस मध्ये नेलं आणि अत्याचार केला .
ती मुलगी काही वेळ त्याच्याशी बोलताना सीसीटीव्हीत दिसत आहे तर अनोळखी व्यक्तींशी बोलताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे. शासकीय यंत्रणा, चौकशी कक्ष हे मदतीला असतातच तर त्यांच्याशी संवाद साधायला हवा होता. मात्र दुर्दैवाने या मुलीने अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि पुढे हा गंभीर आणि वेदनादायी प्रसंग घडला. पोलिसांनी ८ तपास पथक तयार केली आहेत, आठ तपास पथक या सगळ्याचा कालपासून तपास करत आहेत. आरोपीला लवकरच अटक होईल. मात्र माझ आवाहन आहे की तरुण मुलींनी, महिलांनी सार्वजनिक जीवनात वावरताना अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. यंत्रणांची मदत घ्यावी, स्वतःची काळजी घ्यावी.माणसांच्या कळपात हिंस्त्र श्वापदे वावरतात,त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे,आपण सतर्क रहावे.आता या प्रकरणात या पीडित मुलीच समुपदेशन व तसेच जलद तपासासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.