

इंदापूर: पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणावर (यशवंत जलासागर) स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रध्वजाच्या रंगांची आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. ही रोषणाई पाहण्यासाठी नागरिक आणि पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासी गर्दी करीत होते. (Latest Pune News)
उजनी प्रशासनाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून धरणाच्या मोर्यांवर तिरंगा राष्ट्रध्वजाची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त मागील वर्षी 15 ऑगस्टला अशीच रोषणाई केली होती.
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या टि्वटरवरून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करून कौतुक केले होते. उजनी धरणात सध्या 102.45 टक्के पाणीसाठा असून, 118.54 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. धरण 9 ऑगस्ट रोजी शंभर टक्के भरले आहे.