पुणेकरांची चिंता वाढली! एकाच दिवशी जीबीएसमुळे दोघांचा मृत्यू

शहरात सध्या गुलेन बॅरी सिंड्रोमने थैमान घातले आहे.
Guillain-Barre Syndrome
पुणेकरांची चिंता वाढली! एकाच दिवशी जीबीएसमुळे दोघांचा मृत्यूPune News
Published on
Updated on

पुणे: शहरात सध्या गुलेन बॅरी सिंड्रोमने थैमान घातले आहे. एकाच दिवशी जीबीएसमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. या आजारामुळे पुण्यातील नांदेड गावातील एका ६० वर्षीय महिलेचा आणि पिंपळेगुरव परिसरातील एका ३६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृत रुग्णांची संख्या ४ आणि जिल्ह्यातील मृत्यूची संख्या ३ झाली आहे. जीबीएसच्या वाढत्या उद्रेकामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पिंपळेगुरव परिसरातील व्यक्तीला २१ जानेवारी रोजी गुईलेन बॅरी सिंड्रोम या आजाराची लागण झाली होती. तेव्हापासून महापालिकेच्या संत तुकाराम नगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान ३० जानेवारी रोजी या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा व्यक्ती ओला उबेर चालक असल्याची माहिती समोर येते आहे.

तर दुसरीकडे, नांदेड गाव परिसरातील एका ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. महिलेवर मागील 15 दिवसांपासून जीबीएसचे उपचार सुरू होते. दरम्यान, गेल्या रविवारी पुण्यातील धायरी येथील २४ वर्षीय तरुणाचा सोलापूरमध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर, नांदोशी येथील ५६ वर्षीय महिलेचा उपचारांदरम्यान ससून रुग्णालयात बुधवारी मृत्यू झाला होता.

रुग्णसंख्या 130 वर

गुलेन बॅरी सिंड्रोमच्या तीन नवीन रुग्णांची गुरुवारी नोंद झाली. आता जीबीएसच्या रुग्णांची संख्या 130 इतकी झाली आहे. यामध्ये 74 रुग्ण पुणे महापालिकेमध्ये नव्याने समविष्ट झालेल्या गावांमधील असून, 25 रुग्ण पुणे महापालिका, 13 रुग्ण पिंपरी चिंचवड महापालिका, 9 रुग्ण पुणे ग्रामीण आणि 9 इतर जिल्ह्यांतील आहेत. एकूण रुग्णांपैकी 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सिंहगड रोड व जवळील परिसरामध्ये जास्त रुग्ण असून दूषित पिण्याचे पाणी व दूषित अन्न याद्वारे संशयित रुग्ण आढळल्याने या भागात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news