भयानक ! चिमुकल्या बहिणींवर आधी अत्याचार केले मग पाण्याने भरलेल्या बॅरलमध्ये भरून ठेवले

Pune News | राजगुरुनगर येथील भयानक प्रकार
little sisters assault
बहीणींवर अत्याचार File Photo
Published on
Updated on

खेड : दोन लहान मुलींवर अत्याचार करून त्यांना खोलीतल्या पाणी भरण्याच्या बॅरलमध्ये भरून ठेवल्याचा भयानक प्रकार राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावरील एका मोठ्या वर्दळीच्या वस्तीत गुरुवारी (दि २६) उघडकीस आला. नऊ आणि आठ वर्षांच्या या मुली ज्या ठिकाणी राहायला आहेत, त्यालगत असलेल्या एका बियर बारमध्ये काम करीत असलेल्या सहा परप्रांतीय मुलांच्या काही अंतरावर असलेल्या खोलीत पोलिसांना मुलींचे मृतदेह सापडल्याचे बोलले जात आहे.

दोन मुली बुधवारी दुपारी खेळताना गायब झाल्यावर शोध घेण्यात आला; मात्र मिळून न आल्याने पालकांनी संध्याकाळी खेड पोलिसात हरवल्याची तक्रार दिली होती. दोघी सख्या बहिणी बाहेरगावाहून मोलमजुरीसाठी आलेल्या कुटुंबातील या मुली आहेत. हरवलेल्या मुलींचा तपास करताना खबऱ्यामार्फत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार खेड पोलिसांनी मुलींच्या कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या चाळ लगतच्या बारमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या खोलीची झडती घेतली. त्यावेळी अवघे गुडघाभर पाणी असलेल्या एका बॅरलमध्ये भरून ठेवलेल्या दोन्ही मुली मृत अवस्थेत मिळून आल्या. दोघींचे मृतदेह चांडोली ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदणासाठी नेण्यात आले. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिस निरिक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितले.

दरम्यान, राजगुरुनगर येथील एका बार मधील वेटरने हे खून केल्याची प्राथमिक माहीती मिळत आहे. पहाटे चारच्या सुमारास पुण्यातील एका लॉजवरून संशयित वेटरला अटक करण्यात आली. संशयित हा ५० ते ५५ वर्षाचा आहे.

घटनाक्रम 

अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी खेड पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेत या प्रकरणाची माहिती दिली. संशयित आरोपी हा मृत मुलींच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहतो. मोठी मुलगी वर गेली असता तिच्यावर त्याने बळजबरी केली. ती मोठ्याने ओरडल्याने लहान मुलगी धावत वर गेली. बिंग फुटणार म्हणून लहान मुलीला बेडरूममध्ये कोंडून दुसरीला समजावत असताना त्याच्याकडून तिचा खून झाला. खून केल्याचे दुसरीला समजले असल्याने तिलाही त्याने ठार केले. दोघींना बॅरलमध्ये टाकून तो पळून गेला. अत्याचार झाला की, नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती नसल्याचे चोपडे यांनी सांगितले. दरम्यान, आई-वडील आणि नातेवाईकांसह महिलांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news