

कसबा पेठ : त्वष्टा कासार समाज संस्था, पुणे कसबा युवक क्रीडा मंडळ आयोजित महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने पुणे विभागीय शरीर सौष्ठव संघटनेच्या सहकार्याने 'त्वष्टा श्री 2025' जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा रविवार (दि.28) रोजी सायंकाळी 5 वाजता त्वष्टा कासार समाज संस्था महाकालिका मंदिराशेजारी पवळे चौक, कसबा पेठ येथे आयोजित केली आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन जनता सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप यांच्या हस्ते होणार आहे.
ही स्पर्धा सात वजनी गटात घेण्यात येणार असून, प्रत्येक गटात 1 ते 6 रोख बक्षीस व आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे. स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.