

ओतूर: काल दुपारी ४ वाजण्याचा सुमारास नागरिक उकाड्याने हैराण झालेले, सोसाट्याच्या वारा, विजांचा कडकडाट अन् धुंवाधार पाऊस व गारांच्या माऱ्याने जुन्नर तालुक्यातील मढ, पिंपळगाव जोगा परिसर अवकाळीने झोडपून काढला. दरम्यान कल्याण नगर महामार्गावर वाटखळे गावच्या हद्दीत झाडे उन्मळून पडल्याने काहीकाळ वाहतुकीत व्यत्यय आला.
वाहतूक ठप्प झाल्याची माहिती ओतूर पोलिसांना मिळताच ओतूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांचे मार्गदर्शनात वादळी वाऱ्यात महामार्गावर मधोमध कोसळलेले झाड पोलीस हवालदार सुरेश गेंगजे, शामसुंदर जायभाये, संदीप भोते, किशोर बर्डे, पोलीस मित्र शुभम काशीद अमोल मडके, गोरक्षनाथ गवारी यांनी तातडीने घटनास्थळ गाठून जेसीबी यंत्राच्या साहाय्याने बाजूला केले व वाहतूक सुरळीत केली. शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे नेमके किती नुकसान झाले याची ठोस माहिती मिळालेली नाही.