उंडवडीत पालखी मार्गावर टोलचा भुर्दंड सुरू

उंडवडीत पालखी मार्गावर टोलचा भुर्दंड सुरू

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती-पाटस पालखी मार्गावर बुधवार (दि. 21) पासून टोल आकारणीला प्रारंभ झाला. रस्ता चकाचक झाल्यानंतर आता टोलची रक्कम देऊनच या मार्गावरून प्रवास करता येईल. एकेरी प्रवासासाठी मोटार, जीप या छोट्या वाहनांसाठी 65 रुपये टोल आकारणी होईल. एलसीव्ही, एलजीव्ही आणि मिनी बससाठी 110 रुपये, बससाठी 230 रुपये, तीन अ‍ॅक्सल व्यावसायिक वाहनांसाठी 250 रुपये, चार व सहा अ‍ॅक्सल वाहनांसाठी 360 रुपये तर सात किंवा त्याहून अधिक अ‍ॅक्सलच्या अवजड वाहनांना 435 रुपये टोल आकारला जाणार आहे.

टोल नाक्यावर मासिक पासची सोय केली जाणार आहे. टोल नाक्याच्या 20 किमी अंतरात राहणार्‍या अव्यावसायिक स्थानिकांच्या वाहनांसाठी मासिक पास 330 रुपयांत मिळेल. टोल भरल्याच्या वेळेपासून 24 तासांत परतीचा प्रवास केल्यास सर्व वाहनांना 25 टक्के सवलत दिली जाईल. टोल भरल्यापासून एका महिन्यात 50 एकेरी प्रवास केल्यास 33 टक्के सूट मिळणार आहे.

प्रवास झाला खर्चीक

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गामुळे बारामतीहून पुण्याला जाणे अधिक सोपे झाले होते. या महामार्गामुळे पाटसला थेट पुणे-सोलापूर मार्गावर व तेथून पुण्याला जलद गतीने जाणे शक्य होत होते. आता पाटसचा टोल नाका आणि उंडवडीतील टोल नाका, यात फारच थोडे अंतर राहिलेले आहे. या दोन्ही ठिकाणी टोल पावती फाडूनच प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला भुर्दंड बसणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news