नवरात्री 2024 : घटस्थापनेसाठी उद्या दुपारी पावणेदोनपर्यंत मुहूर्त

पंचांगकर्ते मोहन दाते यांची माहिती
ghatsthapana
घटस्थापनाpudhari
Published on
Updated on

नवरात्रोत्सवाची तयारी सगळीकडे जोमाने सुरू आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गुरुवारी (दि. 3 ऑक्टोबर) घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होणार आहे. गुरुवारी ब—ाह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे पाचपासून दुपारी पावणेदोनपर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करता येईल. या वर्षी आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्र दहा दिवसांची आहे, अशी माहिती दाते पंचांगकर्तेचे मोहन दाते यांनी दिली.

नवरात्रोत्सवातील ललिता पंचमी सोमवारी (दि.7 ऑक्टोबर) असून, गुरुवारी (दि. 10) घागरी फुंकून महालक्ष्मीपूजन करावयाचे आहे. शुक्रवारी (दि. 11) महाष्टमी आणि नवमीचा उपवास एकाच दिवशी असून, शनिवारी (दि. 12) विजया दशमीला नवरात्रोत्थापन म्हणजेच नवरात्र समाप्ती आणि दसरा आहे, असेही दाते यांनी सांगितले.

दाते म्हणाले, वयोमानामुळे किंवा आरोग्यविषयक अडचणींमुळे ज्यांना नवरात्रीचे उपवास करणे शक्य नाही, त्यांनी नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करावा. मात्र, तेही शक्य नसल्यास किमान अष्टमीचा उपवास तरी करावा. अशौचामुळे किंवा इतर काही अडचणींमुळे ज्यांना 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापना करणे शक्य होणार नाही, त्यांनी अशौच निवृत्तीनंतर 5 ऑक्टोबर, 8 ऑक्टोबर, 10 ऑक्टोबर किंवा 11 ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी आणि 12 ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन करावे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news