Monsoon Tourism| पुणेकरांनो पर्यटनाला जाताय? ही ठिकाणे ३० सप्टेंबरपर्यंत पर्यटनासाठी बंद!

निसर्गवाटा ३० सप्टेंबरपर्यंत पर्यटनासाठी बंद
These places are closed for tourism till September 30
ही ठिकाणे ३० सप्टेंबरपर्यंत पर्यटनासाठी बंद!File Photo

भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यात पावसामुळे निसरड्या झालेल्या वाटांवर होणाऱ्या अपघाताचा धोका लक्षात घेऊन वन्यजीव विभागामार्फत सदर निसर्गवाटा 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत पर्यटनासाठी बंद करण्यात आल्या आहेत.

These places are closed for tourism till September 30
धुळे : महानगरपालिका क्षेत्रात फलक व बॅनर लावण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

पर्यटनासाठी निसर्गवाटा बंद

भीमाशंकर अभयारण्य वनपरिक्षेत्र अधिकारी वसंतराव चव्हाण यांनी ही माहिती दिली. भीमाशंकरचे दर्शन घेण्यासाठी तसेच पावसाळ्यात धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी या परिसरात होत आहे.

अभयारण्यातील धबधब्यांमधील कुंडातील पाण्याच्या प्रवाहाचा व खोलीचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन धबधब्यांकडे जाणाऱ्या सर्व पायवाटा प्रवेश प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत.

These places are closed for tourism till September 30
धुळे : महानगरपालिका क्षेत्रात फलक व बॅनर लावण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

प्रवेश प्रतिबंधित ठिकाणे

  • कोंढवळ धबधबा जाणारे सर्व मार्ग,

  • चोंडीचा धबधबा

  • खोपिवली नियत क्षेत्र,

  • न्हानीचा धबधबा

  • नारिवली नियतक्षेत्र,

  • गोंगळ घाटनाला -

  • खांडस ते भीमाशंकर मार्ग,

  • शिडीघा पदरवाडी ते काठेवाडी पूर्णतः बंद

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news