युद्धजन्य परिस्थितीमुळे इराणमधून घटलेली निर्यात तसेच परदेशासह देशात काजूसह अन्य सुकामेव्याचे घटलेले उत्पादन आदी कारणांमुळे शाही खाद्य समजला जाणारा सुकामेवा शहरातील बाजारपेठांमध्ये कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. दिवाळीच्या अनुषंगाने सुकामेव्याला मागणी वाढली आहे. मात्र, त्यातुलनेत बाजारात आवक होत नसल्याने सुकामेव्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे, दिवाळीच्या सणात आप्तस्वकियांसह मित्रमंडळींना सुकामेवा भेट स्वरुपात देणार्या पुणेकरांना यंदा त्यांचा खिसा चांगलाच रिकामा करावा लागणार आहे.
इराण-इस्रायल युद्ध, घटलेले उत्पादन यामुळे बाजारात सुका मेवा कमी प्रमाणात येत आहे. दरम्यान, दिवाळीच्या अनुषंगाने खरेदी वाढल्याने सुका मेव्याच्या दरात वाढ झाली आहे.
नवीन गोयल, सुकामेव्याचे व्यापारी, मार्केट यार्ड
सुका मेवा दर (2024) दर (2023)
काजू 750 ते 1200 550 ते 900
अखरोट 850 ते 1500 600 ते 900
काळा मनुका 300 ते 600 250 ते 500
शहाजिरा 800 600
खारा पिस्ता 1000 ते 1500 800 ते 1200
बेदाणा 150 ते 300 150 ते 300
गतवर्षी टान्झानिया आणि साऊथ आफि—केमध्ये मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पादन झाल्याने मोठ्या प्रमाणात काजू उपलब्ध होता. परिणामी, काजूचे दर दहा वर्षातील सर्वांत निच्चांकी 550 ते 900 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले होते. काजूकतलीही स्वस्त मिळू लागल्याने बहुतांश कंपन्यांनी दिवाळीत काजू कतली भेट देण्यास प्राधान्य दिले. यंदा मात्र उलट परिस्थिती आहे. काजूचे दर वाढून 750 ते 1200 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.