शिक्षकांची प्रतीक्षा संपली! नियुक्तीचा मार्ग मोकळा..

शिक्षकांची प्रतीक्षा संपली! नियुक्तीचा मार्ग मोकळा..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : निवडणूक आयोगाने विधान परिषदेतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची निवडणूक स्थगित केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे मतदान झालेल्या जिल्ह्यांनी शिक्षक भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना तातडीने नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या नियुक्ती प्रक्रियेला आता गती मिळणार असून, निवड होऊनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षक विभागातर्फे पवित्र संकेतस्थळाद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यात 11 हजार 85 पदांवर उमेदवारांची निवड करण्यात आली.

परंतु, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे निवड झालेल्या शिक्षकांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीमुळे थांबली होती. परंतु, शिक्षण विभागाने भरती प्रक्रियेच्या पुढील कार्यवाहीबाबत निवडणूक आयोगाला प्रस्ताव दिला होता. त्यानुसार आयोगाने लोकसभा निवडणुकीचे मतदान झालेल्या जिल्ह्यांत शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया करण्यास परवानगी देण्यात आली. लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणूक जाहीर झाल्याने या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नियुक्ती प्रक्रिया आणखी पुढे ढकलली जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आता निवडणूक आयोगाने शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांची निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीचे मतदान झालेल्या जिल्ह्यांनी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले. नियुक्ती दिलेल्या शिक्षकांची माहिती सादर करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भातील सविस्तर आढावा शुक्रवारी होणार्‍या बैठकीत घेतला जाणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news