Pune News | पोलिसांची राहणार करडी नजर

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ३९ वॉच टॉवर तयार करण्यात आले आहेत.
पोलिसांची राहणार करडी नजर
पोलिसांची राहणार करडी नजरFile Photo
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता आज मंगळवारी (१७ सप्टेंबर) दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. त्यासाठी पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे. विसर्जन मार्गावर गणेशभक्तांच्या सोईसाठी बारा ठिकाणी पोलिसांनी मदत केंद्र उभारली आहेत, तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ३९ वॉच टॉवर तयार करण्यात आले आहेत.

या टॉवरवर गुन्हे शाखा आणि शीघ्रकृती दलाचे जवान तैनात असणार आहेत. तसेच, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबरोबरच पोलिसांचे दोन ड्रोन टेहळणी करणार आहे. सकाळी नऊ ते सव्वानऊच्या सुमारास विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. यसाठी साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी मार्शलची पथके असणार आहेत, तर मिरवणुकीच्या वेळी भाविकांच्या मदतीसाठी पोलिसांनी बारा मदत केंद्र उभारण्यात आली आहेत.

येथून नागरिकांना मदतीबरोबरच मिरवणुकीची माहिती पोलिस देणार आहेत, तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ३९ ठिकाणी पोलिसांनी वॉच टॉवर उभारले आहेत. तेथे गुन्हे शाखा आणि शीघ्र कृती दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मिरवणूक मार्गांवर त्यांच्याकडून लक्ष ठेवले जाणार आहे. दोन सत्रांत यंदा पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पोलिसांकडून दोन ड्रोन विसर्जन मिरवणुकीवर टेहळणी करणार असल्याचे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांनी सांगितले.

मुख्य मिरवणुकीसाठी बंदोबस्त अप्पर पोलिस आयुक्त :

०४ पोलिस उपायुक्त : १० सहायक पोलिस आयुक्त : २५ पोलिस निरीक्षक : १३६ स. पो. नि. व पोलिस उपनिरीक्षक : ६५३ पोलिस अंमलदार : ५७०९ • एसआरपीएफ ग्रुप : १ कंपनी होमगार्ड : ३९४ गणेश विसर्जन मुख्य मिरवणूक मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरा व अतिरिक्त विशेष कामासाठी एकूण २०६ कॅमेरे लावण्यात आली आहेत. आरसीपी एकूण ६, वज्र १ व क्यूआरटीच्या १२ टीम तैनात करण्यात आलेल्या आहेत. मुख्य विसर्जन मार्गावर पोलिसांचे वॉच टॉवर साध्या वेशात गुन्हे शाखा, विशेष शाखेची पथके चोऱ्या रोखण्यासाठी खास पथके महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलिस मुख्य विसर्जन मार्गावर एलईडी स्क्रीन लहान मुले, वृद्धांसाठी ठिकठिकाणी मदत केंद्र रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र मार्ग

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news