महापालिकेला बसणार कोट्यवधींचा फटका' थकीत कर रक्कम मिळणार नाही!

पुणे महापालिकेत ऑक्टोंबर 2017 मध्ये उरुळी देवाची, फुरसुंगीसह 11 गावांचा समावेश करण्यात आला होता.
Pune Municipal Corporation
महापालिकेला बसणार कोट्यवधींचा फटका' थकीत कर रक्कम मिळणार नाही! File Photo
Published on
Updated on

पुणे: महापालिकेतून वगळून स्वतंत्र नगरपरिषद स्थापन झालेल्या उरुळी देवाची- फुरसुंगीने चालू आर्थिक वर्षापासून स्वतंत्ररीत्या कर वसुली सुरू केली आहे. नगरपरिषदेने पाठविलेल्या बिलात महापालिकेने आकारलेल्या थकीत कराच्या रक्कमेचाही समावेश असून, आता ही थकीत रक्कम मिळणार नसल्याने महापालिकेला कोट्यवधींचा फटका बसणार आहे.

पुणे महापालिकेत ऑक्टोंबर 2017 मध्ये उरुळी देवाची, फुरसुंगीसह 11 गावांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, महापालिकेत आल्याने अव्वाच्या सव्वा मिळकतकर आकारला जात असल्याचा आरोप येथील रहिवाशांकडून करण्यात येत होता.

त्यामुळे ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन करावी, अशी मागणी आमदार विजय शिवतरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी ही दोन्ही गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याचे आदेश काढले. त्यानुसार आता गावांचे कामकाज नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू आहे.

या आर्थिक वर्षांपासून नगर परिषदेने मिळकत कर आकारणीची बिले नागरिकांना पाठवायला सुरुवात केली असून, ही बिले महापालिकेच्या तुलनेत कमी रकमेची आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांना दिलासा मिळत असला तरी महापालिकेत असताना येथील मिळकतकर धारकांना आकारण्यात आलेली बिले ज्या मिळकत करधारकांनी भरलेली नाहीत, त्या थकीत रकमेचाही समावेश या बिलांमध्ये करण्यात आला आहे.

त्यामुळे आता संबधितांना ती रक्कम भरावी लागणार आहे. मात्र, त्याचा फटका पुणे महापालिकेला सहन करावा लागणार आहे. ही थकित रक्कम महापालिकेला मिळणे अपेक्षित असताना आता नगरपरिषदेने ती वसूल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महापालिकेला काही कोटींच्या थकीत रकमेवर पाणी सोडण्याची वेळ आली. याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी याबाबत शासनाच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news