Pune Rain: पुण्यात मुसळधार; भिडे पुलावरून पाणी

कोथरूड, सिंहगड रस्ता, कात्रज-कोंढवा रस्त्यासह अनेक भागांत साठले पाणी
Pune Rain
पुण्यात मुसळधार; भिडे पुलावरून पाणी Pudhari
Published on
Updated on

पुणे: शुक्रवारी आणि शनिवारी शहरावर संतभार पडणार आहे. ती लगबग सुरू असतानाच शहरावर गत चोवीस तासांपासून संततधार बरसली. पुण्यात पावसाचा जोर वाढला असून, बुधवारी रात्रीपासून गुरुवारी (दि. 19) संध्याकाळपर्यंत धुवाधार पावसामुळे शहरात अनेक भागांत पाणी साठले. कोथरूड, सिंहगड रस्ता, कात्रज-कोंढवा मार्ग, मध्यवर्ती भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साठले.

सिंहगड रस्त्यावर गुडघाभर पाणी साठले होते. खडकवासला व हिंगणे परिसरात डोंगरावरून येणारे पाणी 10 ते 15 घरांमध्ये घुसले होते. शहरात जवळपास 90 ठिकाणी पाणी साठल्याच्या तक्रारी महानगरपालिकेच्या आपत्तीनिवारण कक्षाला प्राप्त झाल्या. (Latest Pune News)

Pune Rain
Rain Alert: आज मध्य महाराष्ट्र, कोकणला अतिवृष्टीचा इशारा; मान्सूनने 75 टक्के देश व्यापला

महानगरपालिकेच्या यंत्रणेने देखील तातडीने तक्रारींची दखल घेत पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना केल्या. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरात प्रमुख रस्त्यांसह काही भागांत वाहतूक कोंडी झाली होती.

सिंहगड रस्ता

पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी शहरात ऊन आणि पावसाचा खेळ सुरू होता. गुरुवारी पहाटे 4 पासून शहरात सर्व भागांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दुपारी 12 पर्यंत पावसाचा जोर कायम होता. तसेच, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या.

पावसामुळे सिंहगड रस्ता, कोथरूड सिटी प्राइड, सातारा रस्ता, कात्रज, बिबवेवाडी, स्वारगेट, भांडारकर रस्ता, प्रभात, सूस-पाषाण मार्गासह मध्यवर्ती पेठांमधील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते, याचा फटका वाहतुकीला बसला. अनेक भागांत पाण्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. सकाळी अनेकांना ऑफिसला जायचे होते. मात्र, वाहतूक कोंडीत ते अडकून पडल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

सिंहगड परिसरातील खडकवासला व हिंगणेतील 10 ते 15 घरांत पाणी घुसले होते. महानगरपालिकेच्या आपत्ती निवारण केंद्राला याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने बचावकार्य राबविले. नागरिकांना स्थलांतरित करण्याची गरज पडली नाही, अशी माहिती महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली.

Pune Rain
Ashadhi Ekadashi 2025 : वरुणराजाच्या सरी झेलत माउलींच्या पालखीचे प्रस्थान

कॅम्प

रस्त्यांना आले ओढ्यांचे रूप पुण्यात गुरुवारी पाऊस झाल्याने ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साठले होते. या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची त्रेधा उडाली होती. अनेक वाहने या पाण्यात अडकून पडली होती. परिणामी, काही नागरिक वाहने ढकलत पुढे जात होती.

एफसी रोड

महानगरपालिकेच्या आपत्तीनिवारण कक्षाकडे 90 तक्रारीपुणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात आपत्तीनिवारण कक्ष सुरू होऊन दोन दिवस झाले असून, गुरुवारी या कक्षाला रस्त्यावर पाणी साठल्याच्या 90 तक्रारी मिळाल्या. हिंगण्यात व उत्तमनगरमध्ये काही घरांत पाणी साठले होते, तर येरवडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत धानोरी जकात नाका, म्हस्केवस्ती, दुर्गा चौक, गुंजन चौक, गांधीनगर येथे रस्त्यावर पाणी साठले होते. येरवडा कार्यालयांतर्गत चंदन स्वीट मार्ट, पौर्णिमा टॉवर, सेव्हन लव्हज चौक, संत गाडगे महाराज चौक, के. के. मार्केट, रविदर्शन चौक, श्रीराम चौक, फातिमानगर आदी ठिकाणी पाणी साठले होते.

पुणे स्टेशन

एकतानगरमध्ये पालिकेचे आपत्तीनिवारणासाठी एक पथक एकतानगरमध्ये गेल्या वर्षी खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने या सोसायटीत पाणी शिरले होते. यामुळे येथील नागरिकांना बाहेर काढण्यात आले होते. यावर्षी देखील खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने एकतानगर परिसरात तातडीच्या मदतीसाठी एक पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.

पाण्याचा निचरा करण्यासाठी कर्मचारी ‘ऑनफिल्ड’

शहराच्या विविध भागांत पाणी साचल्याच्या तक्रारी आल्यावर पालिकेच्या कर्मचार्‍यांनी तातडीने याची दखल घेत ड्रेनेजची झाकणे काढून पाण्याला वाट मोकळी करून दिली. स्वारगेट चौक, पौड रस्ता, कोथरूड परिसर, डेक्कन आदी ठिकाणी पालिकेचे कर्मचारी तैनात होते. त्यांनी केलेल्या कामामुळे हळूहळू काही ठिकाणी तुंबलेले पाणी ओसरले.

भिडे पुलाला टेकले पाणी

मुळा- मुठा नदी पावसामुळे तुडुंब भरून वाहत असून, शहरात झालेल्या पावसामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. खडकवासला धरणातून सकाळी दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते. यामुळे भिडे पुलाला पाणी टेकले होते, तर संध्याकाळी 8 हजार 840 क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news