लिंबूचे भाव गगनाला ; 92 प्रती किलो दर

कांद्याला सरासरी 3 हजार 450 रुपये भाव
lemons price peaked at Rs 92 per kg
प्रतिकिलो 65 रुपये व सरासरी प्रतिकिलो 80 रुपये असे दर निघालेPudhari
Published on
Updated on

सुपे उपबाजारात झालेल्या लिलावात लिंबास प्रतिकिलो 92 रुपये असा उच्चांकी दर मिळाला असून, किमान प्रतिकिलो 65 रुपये व सरासरी प्रतिकिलो 80 रुपये असे दर निघाले. जळोची उपबाजार येथील भाजी मार्केटमध्ये बुधवारी (दि. 28) कांद्यास प्रतिक्किंटल कमाल 4 हजार 600 रुपये व सरासरी 3 हजार 450 रुपये असे भाव निघाले. पुणे शहर जवळ असल्याने लिंबास मोठ्या प्रमाणात मागणी आहे तसेच लिंबू खरेदीसाठी बाहेरील खरेदीदार येत आहेत. बाजारपेठेत लिंबू व कांद्यांस मागणी असल्याने आणि आवक कमी असल्याने उच्चांकी दर मिळत आहेत, अशी माहिती सभापती सुनील पवार व उपसभापती नीलेश लडकत यांनी दिली.

सुपे उपबाजार येथे दर बुधवारी लिंबू लिलाव होत असतात. बारामती तालुक्यासह दौंड, पुरंदर या भागातील शेतकरी लिंबू विक्रीस घेऊन येत आहेत. लिंबू व कांद्यास स्थानिक बाजारपेठेत किरकोळ विक्रीसाठी आणि अन्य पेठेतदेखील मागणी वाढत असल्याने आणखी दर वाढतील, असे अपेक्षित आहे. परंतु चांगल्या मालास उच्च दर मिळत असल्याने लिंबू व कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी आपला माल ग्रेडिंग व निवडून आणल्यास आणखी जादा दर मिळतील, अशी अपेक्षा आहे.

समितीच्या बाजार आवारात शेतमालाचे अचूक माप, लिलावापूर्वी गोणीचे वजन व त्याच दिवशी पट्टी तसेच उघड लिलाव पद्धतीने विक्री व समितीचे नियंत्रण यामुळेच शेतकर्‍यांचा आर्थिक फायदा होत आहे.

अरविंद जगताप, सचिव, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news