

पुणे: पुण्यातील समस्त मिसळप्रेमी खवय्यांची प्रतीक्षा संपली. गेल्या तीन वर्षांच्या यशस्वी आयोजनानंतर यंदा चौथ्या वर्षी ‘पुढारी’ माध्यम समूहाच्या वतीने समस्त पुणेकर मिसळप्रेमींमध्ये प्रसिद्ध असलेल्या महामिसळ महोत्सवाचा शुभारंभ उद्या शनिवारी पुण्याचे सह पोलिस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा यांच्या शुभहस्ते होणार आहे.
हा मिसळ महोत्सव नाहटा लॉन्स, सिंहगड रोड येथे आयोजित केला आहे. या महोत्सवामध्ये पुणे, कोल्हापूर, नाशिक या शहरांमधील प्रसिद्ध मिसळचे व्यावसायिक सहभागी झाले आहेत. हा महामिसळ महोत्सव अनेक मिसळप्रेमी खवय्ये यांचे आणि पुण्याचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य बनला आहे.
महोत्सवात पुण्याची पुणेरी मिसळ, कोल्हापूरची झणझणीत मिसळ, ठाण्याची चविष्ट मिसळ, नाशिकमधील लज्जतदार मिसळ, अशा विविध प्रसिद्ध मिसळचे प्रकार मिळणार असून, मिसळप्रेमींना हे दोन दिवस आपला सकाळचा नाष्टा करण्यासाठी, वीकएंडला हॉटेलिंग करणार्या खवय्यांसाठी दुपारी, संध्याकाळी आपल्या परिवारासोबत झणझणीत, तर्रीबाज, चवदार मिसळचे अनेक वेगवेगळे प्रकार मनमुराद खाण्याची एक चांगली संधी मिळणार आहे.
यासोबत काही स्टॉल्सवर काही गोड पदार्थ, थंड ताक, आईस्क्रीम, चहा, कॉफी यांचाही आस्वाद घेता येईल. या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे या महोत्सवात शनिवारी ‘पुढारी’च्या कस्तुरी क्लबमधील महिला कलाकारांचे उत्तम डान्स परफॉर्मन्स सादर होणार आहेत. याशिवाय ‘मिसळ एक सफर’ हा मराठी, हिंदी गाण्यांचा स्वरमधुर कार्यक्रम गायक किरण देशमुख, गायिका सोनाली कोरडे आणि त्यांचे सहकारी सादर करणार आहेत.
रविवारी 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी सोनी मराठी चॅनेलवरील प्रसिद्ध ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे आणि प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार्या ‘गुलकंद’ या मराठी चित्रपटातील समीर चौगुले, ईशा डे, सचिन गोस्वामी हे कलाकार भेट देणार आहेत. यामुळे त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची, ऐकण्याची संधी सर्वांना मिळणार आहे.
असे विविध वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक, संगीतमय कार्यक्रम सादर होणार असल्याने या महोत्सवास भेट देणार्या प्रत्येक व्यक्तीस वेगवेगळ्या चविष्ट, लज्जतदार आपल्या आवडत्या मिसळचा स्वाद घेत या स्वरमधुर कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे. अशा या उत्तम आणि रंगारंग महोत्सवाचे प्रवेश शुल्क प्रत्येकी फक्त वीस रुपये आहे. तरी मिसळप्रेमी खवय्यांनी, पुणेकरांनी या शनिवारी आणि रविवारी या महामिसळ महोत्सवास आपल्या परिवारासोबत अवश्य भेट द्यावी आणि विविध मिसळच्या चविष्ट डिशेसचा आनंद लुटावा आणि यथायोग्य पेटपूजा करावी, असे आवाहन दै. ‘पुढारी’च्या वतीने करण्यात येत आहे.
महामिसळ महोत्सवास मुख्य प्रायोजक माणिकचंद ऑक्सिरीच, फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. क्रेडिट सोसायटी, एज्युकेशन पार्टनर सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, ईव्ही बाईक पार्टनर ईझी राइड, डेअरी पार्टनर कात्रज डेअरी (पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ), स्नॅक्स पार्टनर लक्ष्मीनारायण चिवडा, टी पार्टनर सोसायटी चहा या प्रायोजकांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले आहे.
महामिसळ महोत्सव कधी व कुठे?
कधी: शनिवार 1 मार्च व रविवार 2 मार्च 2025
कुठे: नाहटा लॉन्स, वीर बाजी पासलकर चौक, वडगाव पुलाच्या सिग्नलच्या अलीकडे, सिंहगड रोड, पुणे.
वेळ: सकाळी 8.30 ते रात्री 10 पर्यंत.
प्रवेश फी: प्रतिव्यक्ती 20 रुपये
माहितीसाठी संपर्क: 9822441953