’ती’ व्यक्ती बिबट्याच्या हल्ल्याने जखमी नाहीच!

वन विभागाचा दावा; सहायक वनसंरक्षकांकडून प्रसिद्धिपत्रक
Leopard attacks
बिबट्याच्या हल्ल्याने जखमी नाहीfile photo
Published on
Updated on

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगाव येथील किसन लक्ष्मण भोर हे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले नाहीत, असा दावा वन विभागाने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे. जुन्नर वन विभागाच्या सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी हे प्रसिद्धिपत्रक जारी केले आहे. या पत्रकात त्यांनी नमूद केले आहे की, हिवरे तर्फे नारायणगाव येथे दि. 28 फेब—ुवारी रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास किसन भोर यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची खबर वन विभागाला देण्यात आली होती.

त्यानुसार त्यांना नारायणगाव येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. वन विभागाकडून त्यांना याबाबतची भरपाई देण्यासाठी ज्या ठिकाणी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला, त्या ठिकाणची वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी पाहणी केली. या वेळी भोर हे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले नाहीत, असे तपासात निष्पन्न झाले. घटनास्थळी चारही बाजूंनी ऊसशेती आहे. या ठिकाणी बिबट्याच्या पाऊलखुणा, विष्ठा किंवा अप्रत्यक्ष खुणा व इतर कोणतेच पुरावे आढळून आले नाहीत. तर, बिबट्या हा त्याच्या नैसर्गिक सवयीने भक्ष्यावर पुढील पायाने हल्ला करतो, त्या वेळी त्याच्या पुढील पायाची नखे बाहेर येतात. मात्र, भोर यांना झालेली जखम ही त्यांच्या गुडघ्याच्या खालील भागावर एकच उभा खोल ओरखडा असल्याचे दिसून आले व तो ओरखडा बिबट्याचा नाही. भोर यांच्या अंगावर इतर कुठेही जखमा दिसून येत नाहीत. त्यामुळे भोर यांच्यावर बिबट्याने हल्ला केलाच नाही, असेही वन विभागाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news