उपनगरात टेनिस बॉल क्रिकेटची भुरळ

उपनगरात टेनिस बॉल क्रिकेटची भुरळ
उपनगरात टेनिस बॉल क्रिकेटची भुरळ
उपनगरात टेनिस बॉल क्रिकेटची भुरळ
Published on
Updated on

हिंजवडी : सागर शितोळे : भारतातील नागरिकांना क्रिकेट प्रेम हे एखाद्या व्यसनासारखे लागले आहे. पूर्वी टेलिव्हिजन सेटवर क्रिकेट पाहण्यासाठी गर्दी होत होती. ती आता मोबाईलवर होत आहे इतकाच काय तो फरक म्हणावा लागेल; पण आजही क्रिकेट चाहते आणि क्रिकेटप्रेमींची संख्या काही केल्या कमी होत नाही.

उपनगरातील खेळाडू टेनिस बॉलच्या क्रिकेट स्पर्धा खेळत असून या टेनिस क्रिकेटला कुठेही व्यावसायिक दर्जा नाही. त्यामुळे उपनगरात सिजन क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्यास निदान हजारातून एखादा व्यावसायिक खेळाडू तयार होऊ शकेल. याबाबत तरुणांनी अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे.

पूर्वी रानमाळावर भरणार्‍या क्रिकेटच्या स्पर्धा, आज ग्रामीण भागात हिरवळ असलेल्या मैदानात भारतात. उपनगर आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झालेल्या क्रिकेटच्या मैदानामुळे या स्पर्धांना एक वेगळेच वलय प्राप्त झाले आहे.त्यामुळे तरुणांमध्ये मागील काही वर्षात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे बाबत आकर्षण निर्माण झाले आहे.

उपनगरातील खेळाडू टेनिस बॉलच्या क्रिकेट स्पर्धा खेळत असून या टेनिस क्रिकेटला कुठेही व्यावसायिक दर्जा नाही. त्यामुळे उपनगरात सिजन क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्यास निदान हजारातून एखादा व्यावसायिक खेळाडू तयार होऊ शकेल. याबाबत तरुणांनी अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे.

पूर्वी रानमाळावर भरणार्‍या क्रिकेटच्या स्पर्धा, आज ग्रामीण भागात हिरवळ असलेल्या मैदानात भारतात. उपनगर आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झालेल्या क्रिकेटच्या मैदानामुळे या स्पर्धांना एक वेगळेच वलय प्राप्त झाले आहे.त्यामुळे तरुणांमध्ये मागील काही वर्षात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे बाबत आकर्षण निर्माण झाले आहे.

पावसाळा संपला की ग्रामीण भागातील बहुतांश तरुणांना वेध लागतात ते क्रिकेटचे. त्यामुळे युवकांची पावले आपोआपच क्रिकेटच्या मैदानाकडे फिरतात.

अगदी ऑक्टोबरपासून सुरू झालेला हा क्रिकेटचा हंगाम फेब्रुवारी, मार्चपर्यंत जोरदार चालतो. या क्रिकेट खेळामुळे ग्रामीण भागातील तरुणांना सावधानता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. अशी चिंतेची भावना खुद पालकांमधून व्यक्त होत आहे.

क्रिकेट हा तसा महागडा खेळ. त्यामुळे यासाठीची जुळवाजुळव करणे म्हणजे तारेवरची कसरत असते. परिसरातील ग्राउंडदेखील अनेकदा अ‍ॅडव्हान्स बुकिंग केले जात आहेत. त्यामुळे अशी ग्राउंडदेखील काही व्यावसायिकांच्या उत्पन्नाचे साधन होत आहे.

या खेळामुळे एखाद्याचे कायमचे उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध झाले आहे, असे चित्र फारच दुर्मिळ पाहायला मिळते. किंबहुना क्रिकेट खेळामुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना फार मोठा फटका बसत आहे. यावर काही बंधन ठेवायला पाहिजे नाहीतर येणार्‍या पिढीला बरबाद होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.

कमीत कमी प्रत्येकाने आपल्या मुलाला क्रिकेटपासून दूर ठेवावे, अशी अपेक्षा चिंताग्रस्त पालक व्यक्त करत आहेत. किमान राजकीय पुढार्‍यांनी तरी याबाबत भान ठेवावे. यातून क्रिकेटसाठी बक्षिसे देताना आपली सामाजिक जबाबदारीचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालयात न जाता काही मुले क्रिकेटकडे वळत आहेत. अनेकजण आपल्या कामाला दांडी मारून स्पर्धेत खेळतात. त्यामुळे अमूल्य वेळ वाया जातो. सध्या निवडणुकांनाचा काळ आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, वाढदिवस आणि गावोगावचे कार्यकर्ते टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भरवत आहेत.

त्यासाठी मोठमोठ्या ट्रॉफी (चषक), आकर्षक बक्षिसे, रोख पारितोषिके ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे अशा स्पर्धांकडे तरुण खेळाडू आकर्षित होत आहेत. यातून नवे 'पोस्टर बॉईज' निर्माण होत आहेत. क्रिकेट स्पर्धेत विजेत्या संघांना हजारो रक्कमेची रोख बक्षिसे, सहलीला पाठवणे अशा प्रकारे आकर्षक आमिष दाखवले जाते. यासह चौकार, षटकार आदीसाठीदेखील मोठी पारितोषिके घोषित करण्यात येतात.

अनेक गावचे गावपुढारी आपला संघ विविध स्पर्धांमध्ये उतरवतात. विविध स्पर्धांमध्ये संघ खरेदी करतात. यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. एका गावातून दोन ते तीन क्रिकेट संघ खेळत असल्याने गावागावांत दुफळी निर्माण होत आहे.

टेनिस बॉल क्रिकेटचे आर्थिक गणित

क्रिकेट खेळताना खेळाडूच्या जर्सीची अंदाजित किंमत 500 रुपये, शूज 500 रुपये, कॅप 100 रुपये, इतर खर्च 500 रुपये असे किमान 1500-1600 रुपये खर्च केला जात आहे. खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 3000 ते 7000 पर्यंत एन्ट्री फी, स्पर्धेच्या ठिकाणी जाण्याचा प्रवास खर्च, जेवण असे नियोजन स्पर्धेपूर्वी करावे लागते.

आयोजनासाठी लाखोंचा खर्च

स्पर्धा आयोजनासाठी मंडप खर्च 30 ते 50 हजार, डीजे 35000, यु-ट्यूब लाईव्ह 25 ते 30 हजार, पंच फी 2000, समालोचक 1500 ते 2000 असा प्रतिदिन खर्च असतो. त्यामुळे यासाठी दानशूर व्यक्तींचा शोध घायवा लागतो.

संघटनात्मक बळ नसल्याने सोईसुविधा अपुर्‍याया

स्पर्धा जरी उत्तम मैदानात खेळावल्या जात असल्या तरीही मागील काही वर्षांत मैदानावर होणारे अपघात, उष्माघात व हृदयविकाराच्या घटना या सोशल मीडियावर पाहायला मिळतात. या स्पर्धा आणि संघटना अधिकृत नसल्यामुळे खेळाडूंना विमा व इतर आवश्यक सुविधा मिळत नसल्याचेदेखील अनेक आयोजकांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news