

Pune Car Accident: टाटा हैरीअर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन शिकाऊ पायलट जागीच ठार झाले असूनदोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना भिगवण-बारामती रस्त्यावर लामजेवाडीजवळ येथे रविवारी (दि. ८) मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वरील चौघे शिकाऊ पायलट टाटा हैरीअर गाडीतून बारामतीकडून भिगवणकडे येत असताना हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, दोन पायलट जागीच ठार झाले आहेत, तर २ जण जखमी आहे. तक्षू शर्मा आणि आदित्य कणसे अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर कृष्णा येशू सिंग आणि चेष्टा बिशोई अशी जखमींची नावे आहेत. कार मधील सर्व जण मद्यपान करून गाडी चालवत होते.
या शिकाऊ पायलटमध्ये बिहार, दिल्ली आणि राजस्थानची एक मुलगी व महाराष्ट्राचा एक मुलगा यांचा समावेश आहे. अपघात नेमका कशाने झाला, याची माहिती अद्याप मिळाली नसून, यातील गंभीर जखमींना केतन वाघ यांच्या आपुलकीच्या रुग्णवाहिकेतून भिगवण येथील खासगी रुग्णालयात तातडीने उपचारासाठी आणण्यात आले. सध्या या जखमी रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.