‘सोमेश्वर’कडून कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई

कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करणार: पुरुषोत्तम जगताप
Pune News
‘सोमेश्वर’कडून कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाईFile Photo
Published on
Updated on

बारामती: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये रोजंदारी तत्त्वावर काम करणार्‍या कर्मचारी व कामगार यांचे हजेरी नोंदीमध्ये संगनमताने कारखाना प्रशासनाची फसवणूक करून आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी कारखान्याचे लेबर व टाइम ऑफिस विभागातील लेबर ऑफिसर, हेड टाइम कीपर, टाइम कीपर, सर्व लिपिक व कर्मचारी यांचे निलंबन करण्याचा निर्णय संचालक मंडळाने गुरुवारी (दि. 27) पार पडलेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेमध्ये घेतला.

सोबतच या सर्वांविरोधात व लेबरपुरवठा करणार्‍या कंत्राटदार यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करणार असल्याची माहिती सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, सोमेश्वर कारखाना सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर असताना कारखान्याच्या कामकाजामध्ये चुकीचे काम करणार्‍या कोणत्याच घटकाला पाठीशी घालू नये, अशी कारखान्याचे मार्गदर्शक उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संचालक मंडळास वेळोवेळी सूचना असते.

असे असताना जाणीवपूर्वक कारखान्याच्या प्रगतीमध्ये अडसर ठरेल व कारखान्याचे नुकसान होईल, असे काही अधिकारी आणि कामगार यांनी कृत्य केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात तत्काळ कारवाई करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. नियमानुसार कायदेशीर मुद्दे विचारात घेऊन या प्रकरणाची इंडस्ट्रियल व लेबर न्यायालयामध्ये काम पाहणार्‍या तज्ज्ञ वकिलांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करून नियमाप्रमाणे सखोल तपास करण्याचा निर्णय देखील संचालक मंडळाने घेतलेला आहे.

जगताप म्हणाले की, या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, सन 2015 पासून आजअखेरपर्यंत रोजंदारी कर्मचार्‍यांची हजेरी नोंद व प्रत्यक्ष दिलेला पगार, झालेले कामकाज इत्यादींचे मान्यताप्राप्त सनदी लेखापालामार्फत ऑडिट करून चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणामध्ये दोषी असणार्‍या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतलेला असून, यामध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news