Pune Supriya Sule News|राष्ट्रवादीपेक्षा आपले जास्त नगरसेवक आले पाहिजेत; खा. सुप्रिया सुळेंनी ठणकावले

मनपा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात
Pune Supriya Sule News
राष्ट्रवादीपेक्षा आपले जास्त नगरसेवक आले पाहिजेत; खा. सुप्रिया सुळेंनी ठणकावलेFile Photo
Published on
Updated on

Supriya Sule Pune civic elections

पुणे: महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा आपले नगरसेवक जास्त आले पाहिजेत. त्यासाठी व्यूहरचना करा आणि कामाला लागा, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका निवडणुकीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे पुणे महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांचे स्पर्धक असणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

आगामी महापालिका निवडणुकीत खासदार सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहरातील प्रमुख पदाधिकार्‍यांची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीला शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार बापूसाहेब पठारे, माजी खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, कमल ढोले पाटील, प्रवक्ते अंकुश काकडे, अश्विनी कदम, सचिन दोडके यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते. (Latest Pune News)

Pune Supriya Sule News
Sports Scheme: पालिकेची खेळाडू दत्तक योजना नावालाच; लाभापासून शहरातील अनेक राष्ट्रीय, राज्य खेळाडू वंचित

या बैठकीत सुळे यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून आपली एकत्र निवडणूक लढण्याची तयारी आहे. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेची मनसेसमवेत जाण्याची तयारी सुरू आहे. ते पाहता आपल्याला काँग्रेसबरोबर एकत्र राहून निवडणूक लढवावी लागेल, अशी शक्यता वर्तविली. त्याृदष्टीने तयारीला लागा, असे सांगत इतरांपेक्षा आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले पाहिजेत, असे बजावले असल्याचे पवार गटाच्या पदाधिकार्‍याकडून सांगण्यात आले.

मतदारसंघाची रचना बदलणार

2029 ला होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वीच मतदारसंघाची रचना बदलणार आहे. त्यासंबधीचे नोटिफिकेशन येत्या दोन ते तीन महिन्यांत निघेल, अशी माहितीही खासदार सुळे यांनी बैठकीत दिली. तसेच ‘वन नेशन वन इलेक्शन’नुसार लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका 2028 ला होऊ शकतात, अशी शक्यताही त्यांनी बैठकीत वर्तविल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news