मार्चच्या अपुर्‍या कोट्यामुळे साखरेचे दर तेजीत राहणार

मागणीच्या तुलनेत 23 लाख टनांचा अपुरा कोटा घोषित
Sugar Prices
साखरेच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. (Pudhari Photo)
Published on
Updated on

पुणे : केंद्र सरकारने मार्च महिन्यासाठी 23 लाख टन साखरेचा कोटा खुला केला आहे. उन्हाळ्यामुळे साखरेचा खप हा पुढील दोन महिने वाढता राहणार आहे. शिवाय, लग्नसराई, यात्रा-जत्रा आणि थंडपेय उत्पाकांची वाढणारी मागणी लक्षात घेता घोषित कोटा मागणीच्या तुलनेत अपुरा असल्यामुळे साखरेचे दर तेजीत राहण्याचा अंदाज घाऊक बाजारपेठेतून वर्तविण्यात आला.

फेब्रुवारी महिन्यातील शिल्लक साखर विक्रीला केंद्राने मुदतवाढ दिलेली नाही. मार्च महिन्यासाठी किमान 24 लाख टनांचा कोटा जाहीर होण्याची अपेक्षा बाजारपेठेला होती. मात्र, अपेक्षेपेक्षा कमी कोटा घोषित करण्यात आल्याने बाजाराची मनोवृत्ती तेजीकडे झुकल्याचे सांगण्यात आले. उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. त्यातच लग्नसराई, यात्रा-जत्रा आणि थंडपेय उत्पादकांकडून नेहमीच्या तुलनेत साखरेचा खप वाढत जातो. मार्च, एप्रिल आणि मे हे साखरेच्या अधिक खपाचे दिवस असल्याने अपेक्षित मागणीनुसार मुबलक कोटा देणे अपेक्षित होते.

साखरेच्या निविदा सध्या 3800 रुपयांपर्यंत जात आहेत. घाऊक बाजारात साखरेला महिनाअखेरीमुळे तूर्त मागणी कमी आहे, तर एस 30 ग्रेड साखरेचा प्रतिक्विंटलचा दर 4100 ते 4150 रुपयांवर स्थिर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news