पुणे : केंद्र सरकारने पुढील महिन्यासाठी मुबलक कोटा जाहीर केला असून, यामुळे साखरेचे दर स्थिरावले आहेत. मात्र, तुटवड्यामुळे नारळाची भाववाढ सुरूच असून, दरात शेकड्यामागे आणखी दोनशे रुपयांनी वाढ झाली. आंबेमोहर तांदळाचे दरही विक्रमी पातळीवर पोहचले आहेत. आवक-जावक साधारण असल्यामुळे खाद्यतेले, अन्नधान्ये आणि डाळी-कडधान्यांचे दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
सप्टेंबर महिन्याकरिता 23.5 लाख टन साखर खुली करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. या महिन्यातील मागणी लक्षात घेता हा कोटा पुरेसा आहे, यामुळे कोट्याच्या घोषणेनंतर साखरेच्या दरात विशेष फेरबदल झाला नाही. कोटा मुबलक असल्यामुळे आगामी काळात दरात काही प्रमाणात घट होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शनिवारी येथील घाऊक बाजारात एस 30 साखरेचा प्रतिक्विंटलचा दर 4200 ते 4250 रुपये होता. आवक-जावक साधारण असल्यामुळे गेल्या आठवड्यातही गुळाचे दर तेजीतच असल्याचे सांगण्यात आले.
उत्पादन केंद्रात नारळाचा तुटवडा असून, मागणी भरपूर आहे. यामुळे गेल्या आठवड्यातही दरात पुन्हा वाढ झाली. स्थानिक बाजारात गणेशोत्सवामुळे नारळास मागणी वाढली आहे. मात्र, आवक कमी प्रमाणात असल्याने आणि उत्पादन केंद्रातच दर कडाडल्यामुळे जुन्या-नव्या तसेच भारी प्रतीच्या नारळाच्या दरात शेकड्यामागे आणखी दोनशे रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. आवक कमी असून, सणासुदीमुळे मागणी चांगली असल्याने गोटा खोबर्याचे दर तेजीतच आहेत.
अपुर्या उत्पादनामुळे आंबेमोहर तांदळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून आंबेमोहर तांदळाचे दर चढेच होते. गणेशोत्सव काळात मागणी वाढल्यामुळे दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली. प्रतिक्विंटलच्या दराने अठराशे ते दोन हजार रुपयांची पातळी गाठली. हा आत्तापर्यंतचा सर्वोच्च दर मानण्यात येत आहे. आवक-जावक साधारण असल्यामुळे अन्य सर्व तांदळांचे दर स्थिर होते. मागणी कमी असल्यामुळे तुरडाळ आणि हरभराडाळीचे दर मंदीतच आहेत. पाऊस चालूच असल्यामुळे नव्या मुगाची आवक अद्यापही वाढलेली नाही. यामुळे दर स्थिर होते. आवक वाढल्यामुळे काबुली चण्याचे दर काही प्रमाणात उतरले आहेत. आवक-जावक साधारण असल्यामुळे गहू, ज्वारी, बाजरी तसेच रवा, आटा आणि मैद्याच्या दरात कोणताही बदल आढळला नाही. गेल्या आठवड्यात शेंगदाणा तेलासह सर्वच खाद्यतेले तसेच वनस्पती तुपाचे दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
येथील घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे : साखर (प्रतिक्विंटल) 4200-4250 रु. खाद्यतेल (15किलो/लिटर) :- शेंगदाणा तेल 2350-2450, रिफाइंड तेल 2200-2750, सरकी तेल 2050-2400, सोयाबीन तेल 1930-2150, पामतेल 1900-2100, सूर्यफूल रिफाइंड तेल 2030- 2200, वनस्पती 1880-2250, खोबरेल तेल 6300 रु. तांदूळ :- गुजरात उकडा 3500-4000, मसुरी 3500-4000, सोना मसूरी 4500-5000, एच.एम.टी. कोलम 5500-6500, लचकारी कोलम 6500-7000, चिन्नोर 4500-5000, 1121-11000- 11500, आंबेमोहर (सुवासिक) 18000-2000, बासमती अखंड 12000-13000, बासमती दुबार 9500-1000, बासमती तिबार 10000-10500, बासमती मोगरा 5500-6500, बासमती कणी 4000-4500, 1509-8500-9500, इंद्रायणी 5500-6000 रु. गहू - लोकवन नं. 1 4000-4200, लोकवन नं. 2 3600-4000, नं.3 3300-3600, सिहोर नं. 1 5700-6000, सिहोरी 3800-4400, मिलबर 3100 रु. ज्वारी :-गावरान नं. 1 5500-5800, गावरान नं.2 4800-5000, नं.3 3500-3800, दूरी नं.1 3600-4000, दूरीनं.2 3200-3500 रु बाजरी :- महिको नं.1 3700-3800, महिको नं.2 3300-3500, गावरान 3500-3600, हायब्रीड 3200-3300 रु. गूळ :- गूळ नं. 1 4450-4600, गूळ नं.2 4300-4400 गूळ नं.3 4125-4250, नं. 4 4000-4100 बॉक्स पॅकिंग 4200-5400 रु. डाळी :- तूरडाळ 9000-10100, हरभराडाळ 7500-7700, मूगडाळ 9000-9600, मसूरडाळ 7600- 7700, मटकीडाळ 8300-8400, उडीदडाळ 9000-10300 रु. कडधान्ये :-हरभरा 6800-7000, हुलगा 4800-5200 चवळी 7000-10500, मसूर 7100-7300, मूग 9000-9200, मटकी गावरान 7500-8000, मटकी पॉलिश 6600-6800, मटकी गुजरात 6600-6800, मटकी राजस्थान 6600-6800, मटकी सेलम 15500-16000, वाटाणा हिरवा 13500-14500, वाटाणा पांढरा 4000-4200, काबुली चणा 7500-12500 रु. साबुदाणा :-साबुदाणा नं.1 5500, साबुदाणा . नारळ :- (शेकडयाचा भाव) : नवा पॅकिंग 2800-3000, मद्रास 5000-5100, पालकोल जुना 3000-3100, सापसोल 4500-5300 रु.