शहरात भटक्या कुत्र्यांची नागरिकांमध्ये दहशत..!

शहरात भटक्या कुत्र्यांची नागरिकांमध्ये दहशत..!

वडगाव शेरी : पुढारी वृत्तसेवा : नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. वडगाव शेरी, खराडी, विमाननगर आणि कल्याणीनगरमध्ये लहान मुले व नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटना दररोज घडत आहेत. यामुळे परिसरातील रहिवाशांत या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. शहर व उपनगरांत भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकांकडून कचर्‍यात शिळे अन्न टाकले जात असल्याने कचर्‍याच्या परिसरात या कुत्र्यांच्या वावर वाढला आहे. भटकी कुत्री पकडण्यासाठी महापालिकेचे श्वान पथक आहे. मात्र, या पथकाला कुत्री सापडत नाही.

श्वान पथकांची गाडी पाहिल्यानंतर कुत्रे पसार होतात. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार वर्षाला जवळपास दहा ते बारा हजार नागरिकांना कुत्री चावा घेतात. महापालिकेने वर्षात सात ते आठ हजार कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केल्यानंतर देखील त्यांची संख्या वाढत असल्याचा विरोधाभास दिसून येत आहे. वडगाव शेरी, कल्याणीनगर, खराडी, चंदननगर येथील अनेक चौकांत हे दिसून येत असून, ते वाहनांचा पाठलागत करीत आहेत. तसेच पादचार्‍यांच्या अंगावरदेखील धावून जात आहेत. अनेकदा रात्री रस्त्यावरून जाणार्‍या नागरिकांना ही कुत्री त्रास देतात. लहान मुलांवर देखील ही कुत्री हल्ला करीत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news