अवकाशातील महाकाय कृष्णविवरांच्या भोवती दर 48 तासांनी तार्यांचे स्फोट कसे होतात. हे प्रथमच टिपण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. अमेरिकेतील नासा आणि भारताच्या इस्त्रो या अंतराळ संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी हे संशोधन संयुक्तरित्या केले. यात पुण्यातील आयुका या संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. गुलाब देवांगन यांचा समावेश आहे.
अवकाशात पृथ्वीपासून लाखो प्रकाशवर्षे अंतरावर अनेक कृष्णविवरे आहेत. या विषयी मानवाला मोठे गुढ होते. कृष्णविवरांजवळ गेलेली वस्तू कधीच परत का येत नाही. ही विवरे अंधकारमय असूनही ती स्वयंप्रकाशित का दिसतात. असे अनेक प्ऱश्न शास्त्रज्ञांना पडले होते. या सर्व प्रश्नांची सुस्पष्ट उत्तरे आता मिळाली आहेत. नासाच्या चंद्रा, हबल आणि इस्त्रोच्या अॅस्ट्रोसॅट या अद्ययावत दुर्बिणीच्या सहाय्याने हे वेगळे संशोधन करण्यात आले. हा शोधनिबंध नेचर जर्नल या जागतिक शोधपत्रिकेत नुकताच प्रसिध्द झाला. यात पुणे आयुकाचे ( इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अस्ट्रोनॉमी अॅन्ड अॅस्ट्रो फिजिक्स) खगोल शास्त्रज्ञ प्रा. डॉ. गुलाब देवांगन हे सह लेखक आहेत.
दोन कृष्णविवरांमध्ये जर मोठी आकाशगंगा असेल तर ती दोन्ही कृष्णविवरे त्या तार्यांच्या आकाशगंगेला आपल्याकडे खेचतात. ज्या विवराची ताकद जास्त तिकडे ती अख्खी आकाशगंगाच खेचली जाते. त्यामुळे कृष्णविवरेच प्रकाशमान झाल्यासारखी वाटतात. मात्र तो प्रकाश त्या आकाशगंगेतील तार्यांचा असतो. या तार्यांचे स्फोट (उद्रेक) या वेळी होतात. ही प्रक्रीया टिपण्यात प्रथमच भारत आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञांना यश आले आहे.
पाच वर्षांपूर्वी म्हणजे 2019 मध्ये खगोल शास्त्रज्ञांनी एका मोठ्या तार्यांची अशीच हालचाल टिपली. तो तारा एका मोठ्या कृष्णविवराजवळ गेला होता. त्या तार्याचे तुकडे होऊन त्याचे ते अवशेष कृष्णविवराभोवती तबकडी तयार करून फिरू लागले. पाच वर्षांत ही तबकडी खूप विस्तारली. कारण त्या तुकड्यांचे स्फोट होऊन त्यातून क्ष किरण परवर्तीत होऊ लागले. हेच क्ष किरण टिपण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.
अवकाशातील महाकाय (सुपर मॅसिव्ह) अशा कृष्णविवरांभोवती फिरणार्या तार्याचे स्फोट दर 48 तासांनी होतात. या स्फोटांवरून विवरांभोवती तयार झालेल्या डिस्कचा आकार मोजणे शक्य झाले. हा जो स्फोट आम्ही टिपला. त्याचा कालावधित सुमारे पाच वर्षांचा आहे. भारताच्या अॅस्टोसॅट या दुर्बीणीच्या साहाय्याने आम्ही हा अभ्यास केला. यात क्ष किरण(एक्स-रे) आणि अतिनील किरण (अल्टाव्हायलेट-रे) यांच्या सहाय्याने हे उद्रेक टिपणे शक्य झाले.
प्रा.डॉ. गुलाब देवांगन, शास्त्रज्ञ, आयुका पुणे