ST Bus Corruption: एसटीची कोट्यवधींची दुरुस्तीकामे ‘आउटसोर्स’, कमिशनसाठी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार; श्रीरंग बरगे यांचा आरोप

काहींकडून तसे पुरावेही प्राप्त झाल्याचा दावा बरगे यांनी केला आहे.
Shrirang Barge
एसटीची कोट्यवधींची दुरुस्तीकामे ‘आउटसोर्स’, कमिशनसाठी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार; श्रीरंग बरगे यांचा आरोप Pudhari Photo
Published on
Updated on

जळोची: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या स्वतःच्या कार्यशाळा व कुशल कामगार आहेत. असे असतानाही केवळ कमिशनसाठी कोट्यवधींची दुरुस्तीकामे बाहेरून केली जातात. राज्यभरात गेल्या काही महिन्यांत अंदाजे दहा कोटी रुपयांची कामे बाहेरून करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे बेकायदेशीर खरेदीसुद्धा केली जाते. त्यात कमिशनखोरी होत असल्याचा दावा महाराष्ट्र एसटी कर्मचारी, काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

याबाबत बगरे यांनी राज्यभरातील अनेक कामांची माहिती दिली. परभणी विभागातील यांत्रिकी व भांडार शाखेतील अधिकार्‍यांनी गेल्या 8-9 महिन्यांत सुमारे 52 लाख रुपये खर्च करून बसदुरुस्तीची कामे बाहेरच्या संस्थांकडून केली आहेत. (Latest Pune News)

Shrirang Barge
Purandar Fort: पुरंदर किल्ल्याचा विकास आराखडा बनवावा; आमदार विजय शिवतारेंची विधानसभेत मागणी

या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवली नाही. त्यामुळे नियमबाह्य कामे केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या कामांतून कमिशन घेतल्याची शंका उपस्थित होते, तर काही पुरवठादारांनी तशी कबुली दिली आहे, तर काहींकडून तसे पुरावेही प्राप्त झाल्याचा दावा बरगे यांनी केला आहे.

राज्यभराचा आढावा घेतला असता काही महिन्यांत साधारणत: दहा कोटी रुपयांची कामे बाहेरून करण्यात आली आहेत. स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात सामानाची खरेदी करण्यात आली आहे. त्यातील पाच ते दहा टक्के इतकी रक्कम कमिशन म्हणून संबंधित विभागीय पातळीवरील अधिकार्‍यांना मिळाले आहे. गेली अनेक वर्षे स्थानिक पातळीवर कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा अंदाज अंदाज बरगे यांनी व्यक्त केला आहे.

हल्लीच एका भ्रष्टाचारी अधिकार्‍याच्या बडतर्फीची घोषणा राज्याचे परिवहन मंत्र प्रताप सरनाईक यांनी केली आहे. विभागीय पातळीवरील अधिकार्‍यांनी स्वतःच्या मर्जीप्रमाणे केलेल्या खरेदीची तपासणी केली तर मोठे घबाड बाहेर येईल, असेही बरगे यांनी म्हटले आहे.

...असा आहे नियम

एसटी महामंडळाचे राज्यभरात 31 विभाग आहेत. प्रत्येक विभागात विभागीय कार्यशाळा आहेत. तेथे बसदुरुस्तीसाठी कुशल कर्मचारीवर्ग कार्यरत आहेत. एसटीच्या बसच्या दुरुस्त्या या स्थानिक वर्कशॉपमध्ये होत नसतील तर मध्यवर्ती कार्यशाळेत या दुरुस्त्या करणे क्रमप्राप्त आहे. तिथे देखील न झल्यास वरिष्ठ अधिकार्‍यांच्या लेखी परवानगीने पुढील कार्यवाही करावी लागते.

Shrirang Barge
Leopard News: आंबेगावच्या पूर्व भागात बिबट्यांचा वावर वाढला; शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण

हे सर्व नियम धाब्यावर बसवून अधिकार्‍यांनी थेट बाह्य संस्थांकडून बसच्या सर्व प्रकारच्या दुरुस्त्या करून घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे नियम व निकष डावलून खरेदी करण्यात आली आहे. काही बनावट कोटेशन व बनावट संस्थांकडून खरेदी करण्यात आल्याचा मोठा आरोप बरगे यांनी या वेळी केला आहे.

एकाच संस्थेकडून 3 कोटेशन

काही विभागांतील खरेदी व बाह्य संस्थेकडून केलेल्या कामाचा आढावा घेतल्यास एकाच संस्थेकडून तीन बनावट कोटेशन मागविले जाते. मूळ कोटेशनच्या तुलनेत दोन कोटेशनमध्ये दर वाढवून दाखविले गेले आहेत.

परिणामी, स्थानिक वर्कशॉपमध्ये होणार्‍या खर्चाच्या तुलनेत या कामांना अनावश्यक जास्त दर आकारले गेले. काही विभागांत यंत्र अभियंत्याच्या तोंडी आदेशावर बस थेट पाठवून दुरुस्तीचे प्रकार वारंवार घडले. या व्यवहारात यंत्र अभियंता चालन व अनेक भांडार शाखेतील अधिकारी आदींचा समावेश असल्याचे दिसून आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news