SSC, HSC exam fee | यंदा दहावी परीक्षा फी 640, तर बारावीची फी 650 रुपये

परीक्षा मंडळाचे विद्यार्थ्यांना चटके!
SSC, HSC exam fee |
SSC, HSC exam fee | यंदा दहावी परीक्षा फी 640, तर बारावीची फी 650 रुपयेFile Photo
Published on
Updated on

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे 2021-2022 दहावीसाठी 415 रुपये आणि बारावीसाठी 520 रुपये शुल्क होते. ते जून-जुलै 2026 मध्ये दहावीसाठी 640 रुपये आणि बारावीसाठी 650 रुपये घेण्यात येणार आहे. गेल्या चार वर्षांचा आढावा घेतला, तर राज्य मंडळाने दहावीच्या शुल्कात 225 रुपयांची, तर बारावीच्या शुल्कात 130 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मात्र दरवर्षी शुल्कवाढीचे चटके बसत आहेत.

राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी परीक्षा शुल्कवाढीबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार परीक्षा शुल्कासह प्रशासकीय शुल्क गुणपत्रिका शुल्क, प्रमाणपत्र शुल्क, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क यांच्यातील नवी वाढ केली आहे.

पुन्हा शुल्कवाढ बोजा कशासाठी : राज्य मंडळाने 2022 मध्ये शुल्कवाढीचा निर्णय घेतला होता. त्यास शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार तीन वर्षांत एकूण 30 टक्के शुल्क वाढवण्यात आले; मग आता पुन्हा शुल्कवाढ कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news