

पुणे: अहमदाबादजवळील विमान अपघातानंतर काही तासात पुण्यातील दक्षिण कमांडच्या नेतृत्वाखाली अहमदाबाद छावणीतील भारतीय सैन्याच्या तुकड्यानी आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी तैनात करण्यात आल्या. हे सैनिक अहोरात्र तेथे काम करीत आहे. (Latest Pune News)
सैनिकांनी अपघातस्थळी जलद प्रवेश करण्यासाठी त्या भागातील काही भिंती तोडाव्या लागल्या. नागरी प्रशासन, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि इतर प्रथम प्रतिसादकर्त्यांशी जवळून समन्वय साधून बचाव कार्य त्वरित सुरू करण्यात आले.सैन्यदलाच्या सर्व रँकचे अधिकारी अन कर्मचारी खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत.